Lok Sabha Election : लोकसभेला उमेदवार देणारच; मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीचे जोरदार वारे वाहत आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून आपले उमेदवार निश्चित केले जात आहेत. त्यानुसार  अहमदनगर जिल्ह्यातील सकल मराठा समाज  लोकसभा निवडणुकीसाठी एक उमेदवार देणार असल्याचा ठराव आज मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला. 

मराठा आरक्षणाच्या  मागणीबाबत निर्णय न झाल्याने समाजाची राज्य सरकारवर नाराजी आहे. यात लोकसभा निवडणुकीची  आचारसंहिता लागल्याने निर्णय लांबला आहे. दरम्यान लोकसभेसाठी राजकीय पक्ष तयारीला लागले असून उमेदवारांची नावे निश्चित केली जात आहेत. त्यानुसार मराठा समाज देखील उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. कोणत्याही पक्षाला पाठिंबा देण्याऐवजी मराठा समाजाचा उमेदवार या निवडणुकीत देण्यात यावा; असा ठराव सर्वांनुमते करण्यात आला आहे. 

Lok Sabha Election : 'माझी ही शेवटीची निवडणूक असेल...', उमेदवारी जाहीर झाल्यानंतर चंद्रकांत खैरे भावुक

३० मार्चला उमेदवाराची घोषणा 

या बाबतचा अवहाल मनोज जरांगे पाटील यांना देण्यात येणार आहे. अनेक उमेदवार निवडणुकीसाठी इच्छुक असल्यामुळे सर्व बाजूंनी विचार करून या सर्व उमेदवारांचा अंतिम अहवाल मनोज जरांगे पाटील यांच्याकडे ३० मार्च रोजी सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर उमेदवारी बाबत घोषणा होऊ शकते अशी माहिती अहमदनगर येथील मराठा समाज समन्वयकांनी दिली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply