Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येऊ शकतात, आमदार संजय शिरसाटांचा मोठा दावा

Lok Sabha Election :   निवडणुकीत  राज ठाकरे  आणिएकनाथ शिंदे एकत्र येऊ शकतात असा मोठा दावा शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट  यांनी केलाय. फेब्रुवारीत हे दोन नेते एकत्र येऊ शकतात असा दावा शिरसाट यांनी एबीपी माझाशी बोलताना केला. काल राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची पुन्हा भेट झाली. शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटी वारंवार होत आहेत. त्यामुळे हे दोन नेते एकत्र येऊ शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र शिरसाट यांनीही आज त्याला दुजोरा दिला. 

Nagpur Accident: हृदयद्रावक! डंपरच्या धडकेत बहिण- भावाचा मृत्यू; नागपुरातील घटना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीवर बोलताना  संजय शिरसाट  म्हणाले, राज ठाकरे आणि राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केला जात आहे. राजकीय भेट ही जाहीरपणे घेतली जात नाही. राज  ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र आल्यास हा राजकरणातील  मोठा बॉम्बस्फोट असेल. सध्याच्या घडीला ते एकत्र येण्याची कोणतीची चिन्ह नाही. राज ठाकरे सोबत आले तर काही गैर नाही.  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जानेवारीच्या शेवटच्या आणि  फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काही बैठका झाल्या तर त्यामध्ये काही निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र सध्या काही चर्चा नाही. निवडणुकीत प्रत्येकाची आवश्यकता प्रत्येकला भासते. त्यामुळे राज ठाकरे सोबत आले तर आनंद आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply