Leopard Attack : चाळीसगाव (जळगाव) लिंबाच्या बागेत वडील काम करत असताना त्यांच्या बाजूला खेळत असलेल्या चार वर्षीय बालिकेवर बिबट्याने झडप घालून ठार केल्याची घटना चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव शिवारात २ डिसेंबरला दुपारच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे. गेल्या चार महिन्यांत बिबट्याचा हल्ला झाल्याची तिसरी घटना आहे.
चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव शिवारात पुष्कर रवींद्र चव्हाण यांचे शेत असून शेतात लिंबाच्या बागेची राखण करण्यासाठी चार ते पाच महिन्यांपासून मध्य प्रदेशातील कांज्या मांजऱ्या पावरा हे पत्नी व तीन मुलींसह वास्तव्यास आहेत. दरम्यान गुरुवारी दुपारी साडेचार ते पाचच्या दरम्यान कांज्या पावरा हे लिंबाच्या बागेत काम करीत होते. यावेळी बाजूलाच त्यांची मुलगी रसला (वय ४) खेळत होती. दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्या बालिकेवर झडप घालत तिला ओढत नेले.
|
जखमी चिमुकलीचा मृत्यू
सदरचा प्रकार लक्षात येताच कांज्या पावरा याने आरडओरड केली. आवाज ऐकून आजूबाजूचे शेतकरी धावत आले. शेतकऱ्यांनी जोरजोरात आरडाओरड केल्यानंतर हल्ला करणारा बिबट्या तेथून पसार झाला. बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रसला हिला तत्काळ चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले.
शिवारात बिबट्याच्या कायम वावर दरम्यान या भागात अनेकदा बिबट्याचे दर्शन झाले आहे. कन्नड घाट गावापासून जवळच असल्यामुळे बिबट्यांचा नेहमीच वावर असतो. त्यामुळे बिबट्याचा बंदोबस्त करण्यासंदर्भात रांजणगाव ग्रामपंचायतीने वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना पत्र दिले होते. मात्र, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दखल घेतली नसल्याचे रांजणगावच्या ग्रामस्थांचे म्हणणे आहे. बालिकेचा बळी गेल्याने ग्रामस्थांमध्ये अगोदर असलेली बिबट्याची भीती आणखी वाढली आहे. त्यामुळे शेतांमध्ये वावर असलेल्या बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे.
शहर
महाराष्ट्र
- Vadodara Accident Case : भरधाव कारने महिलेला चिरडलेल्या तरुणाच्या रक्तात सापडले अंमली पदार्थांचे अंश, पण न्यायालय ग्राह्य धरणार का?
- Ahilyanagar : वर्षभरात ७४ हजार २७० वीज ग्राहकांच्या देयकांच्या तक्रारी, महावितरणच्या ६९ टक्के देयकात चुकीची अकारणी
- Pune : शेवग्याच्या दरात मोठी घसरण, किरकोळ बाजारात ४० रुपये किलो
- Nashik : कळसुबाईवर लवकरच रज्जुमार्ग; २५० कोटींचा निधी मंजूर
गुन्हा
- Mumbai Crime : खळबळजनक! मुंबईत ३८ दिवसांच्या बाळाची विक्री करण्यासाठी चोरी? पोलिसांनी असा उधळला चोरट्यांचा डाव
- Pune : शनिवार पेठेतून दुचाकी चोरणारा गजाआड, चोरट्याकडून दुचाकी चोरीसह घरफोडीचे गुन्हे उघड
- Pune Crime : टोळक्याकडून निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला मारहाण; तलवारी उगारुन घरातील साहित्याची तोडफोड
- Ghatkoper Crime : नकोशी! पाळण्याच्या दोरीनेच ४ महिन्याच्या लेकीचा बापाने जीव घेतला, घाटकोपर हादरलं
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Kedarnath : केदारनाथ, हेमकुंड साहिबला ‘रोप-वे’
- Cape Canaveral : खासगी यानाचे चंद्रावर पाऊल; नासाच्या सहकार्याने ‘फायरफ्लाय एअरोस्पेस’ची मोहीम
- IIT Baba News : भर कार्यक्रमात IIT बाबाला काठीनं झोडलं, पोलिसांनी नोंदवली नाही कंप्लेंट; लाईव्ह येत म्हणाला..
- Weather Update : चक्रीवादळ वाऱ्यांमुळे वातावरणात मोठा बदल; 'या' राज्यात होणार मुसळधार पाऊस, हवामान खात्याने वर्तवला अंदाज