Law Against Love Jihad : महाराष्ट्रात लव्ह जिहाद विरोधात कायदा लागू करण्याची तयारी

मुंबई : राज्यात लव्ह जिहादच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचं सांगत याविरोधात कायदा करण्याच्या हालचाली आता सरकारकडून सुरु झाल्या आहेत. त्यानुसार, राज्य विधीमंडळाच्या येत्या हिवाळी अधिवेशनात हा कायदा मंजूर करण्याचा सरकारचा प्रयत्न असणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे. 

सध्या उत्तर प्रदेशात अशा प्रकारचे 'लव्ह जिहाद' विरोधात कायदा अस्तित्वात आहे. युपीतल्या या कायद्यातील तरतुदींनुसार, लग्नानंतर जबरदस्तीने धर्मांतर करणे, कोणाशीही खोटं बोलून विवाह करणे तसेच अशा विवाहाला सहाय्य करणं हे कायद्यानुसार गुन्हे आहेत.

यात दोषी असल्याचं सिद्ध झाल्यास आरोपीला 3 ते 5 वर्षांचा तुरुंगवास आणि दोन लाख रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. यामध्ये पीडित मुलगी जर 18 वर्षांपेक्षा लहान असेल किंवा अनुसूचित जाती वा जमातीची असेल तर चार ते सात वर्षांचा तुरुंगवास आणि कमीत कमी तीन लाख रुपयांच्या दंडाची तरतूद यामध्ये आहे. त्याचबरोबर कोणती संस्था किंवा संघटना या गुन्ह्यात सहभागी असेल तर त्याला तीन ते 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूदही आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply