Latur Crime : चोरी करताना पहिले म्हणून विद्यार्थ्यांचा दगडाने ठेचून खून; अहमदपूर तालुक्यातील धक्कादायक घटना

Latur Crime : लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील येलदरवाडी येथे एका १३ वर्षीय गतिमंद विद्यार्थ्यांचा दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. चोरी करताना पहिले असून आपल्या विरोधात साक्ष देईल या भीतीने हि हत्या करण्यात आली आहे.

लातूर जिल्ह्यातील यलदरवाडी गावात घडलेल्या सदरच्या घटनेमध्ये गावातील २५ वर्षीय गुंडगिरी प्रवृत्तीच्या तरुणांने गावातच एका घरात चोरी केली. चोरी करून तो घराबाहेर पडला, त्यावेळी रुकेश उर्फ गोटू गित्ते या गतिमंद मुलाने त्याला पाहिले होते. त्यामुळे आपल्याविरोधात चोरी केल्याची साक्ष देईल; या भीतीपोटी संशयिताने रुकेश याला गावातील ओढ्यात नेऊन दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

Ratnagiri News : रत्नागिरीला मुसळधार पावसाचा फटका, परशुराम घाटात भिंत कोसळली; जगबुडी नदीनेही इशारा पातळी ओलांडली

संशयित फरार 

या घटनेनंतर गुन्ह्यातील संशयित आरोपी सध्या फरार असल्याचे पोलिस अधिकारी सांगत आहेत. दरम्यान या घटनेबाबत मयत मुलाच्या आजोबाच्या फिर्यादीवरून किनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यावरून पोलिसांकडून संशयिताचा शोध सुरु केला आहे. 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply