Lakhandur News : बोगस कंपनी व्यवसाय करून १ कोटींची फसवणूक; लाखांदुरमधून चार जण ताब्यात

Bhandara : लाखो रुपयांच्या गुंतवणुकीवर मोठ्या प्रमाणात आवश्यकतेनुसार गुंतवणूक केलेली रक्कम परत करण्याचे आमिष देऊन एका बोगस कंपनीची सुरवात केली. याच्या माध्यमातून पाच व्यक्तींनी संगणमत करून ७ नागरिकांची १ कोटी १६ लाख रुपयांनी फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणी ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील चार जणांना लाखांदूर येथून अटक केली आहे.

भंडारा येथील आर्थिक गुन्हे शाखा व लाखांदूर पोलिसांनी हि कारवाई केली आहे. या फसवणुकीच्या प्रकरणात हितेश मधुकर चुटे (वय ३५, रा. सडक अर्जुनी), रत्नेश गुरुप्रसाद तिवारी (वय ४५, रा. वडसा), किशोर चरणदास गोंडाणे (वय ४५, रा. परसटोला), मंगेश डाकराम वाणी (वय ४२, रा. पाहुणगाव) व रवींद्र प्रल्हाद बोरकर (वय ५१, रा. ईटान) यांनी संगनमत करुन फिर्यादींना जीटी कोर एसटी कन्सल्टन्सी नामक बोगस कंपनीत लाखो रुपयांच्या गुंतवणूक करण्यास सांगितले.

Railway Block : पश्चिम रेल्वेवर दोन दिवस स्पेशल ब्लॉक; १२७ लोकल रद्द; ७ मेल एक्सप्रेसवर परिणाम

सात जणांनी केली गुंतवणूक

या गुंतवणुकीवर मोठ्या प्रमाणात व्याजाच्या रकमेसह प्रतिमहा हजारो रुपयांची रक्कम देण्याचे आमिष दिले. त्यानुसार यात सात जणांनी १ कोटी १६ लाख रुपयांची रक्कम गुंतवणूक केली. मात्र त्यांना फेब्रुवारी २०२४ पासून व्याजासह प्रतिमाह उपलब्ध होत असलेली रक्कम देणे बंद करण्यात आले. यावेळी फिर्यादींनी आरोपींना गुंतवणूक केलेली रक्कम परत करण्याची मागणी केली. मात्र, आरोपींनी मागील वर्षभरापासून गुंतवणूकदाराशी संपर्क तोडून गुंतवणूक केलेली रक्कम परत केली नाही.

५८ लाखांची वाहने केली जप्त

दरम्यान फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर याबाबत पोलिसात तक्रार देण्यात आली. या तक्रारींवरून पाचही आरोपींविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यापैकी ४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर आरोपींच्या ताब्यातून ५८ लाख १५ हजार रुपये किमतीची वाहने जप्त केली आहेत. या वाहनांमध्ये ४ चारचाकी वाहने व २ दुचाकींचा समावेश आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply