Lady Singham : ‘ डॅशिंग लेडी सिंघम जुनोमनी राभा यांचा अपघाती मृत्यू ; होणाऱ्या नवऱ्याला केली होती अटक

Lady Singham :  लेडी सिंघम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणात आपल्या होणाऱ्या नवऱ्याला अटक करणाऱ्या आणि वादग्रस्त कारकिर्द ठरलेल्या जुनोमनी राभाचा अपघाती मृत्यू झाला आहे. त्या आसाम पोलीस दलात उप निरीक्षक म्हणून कार्यरत होत्या. नागाव जिल्ह्यातील कलियाबोर येथील सरूभुगिया गावात या लेडी सिंघमची कार एका कंटेनरला धडकली. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला आहे.

जुनोमनी या आपल्या खासगी कारमधून प्रवास करत होत्या. त्यांनी वर्दी परिधान केलेली नव्हती. त्यांच्या कारची कंटेनर ट्रकला धडक बसली. या अपघातात त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जुनोमनी राभांना लेडी सिंघम आणि दबंग कॉप म्हणूनही ओळखलं जात होतं. त्या मोरीकोलोंग पोलीस ठाण्याच्या प्रभारी होत्या. गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई करणाऱ्या पोलीस अधिकारी म्हणून त्या खूप प्रसिद्ध होत्या. काल (सोमवारी) मध्यरात्री 2.30 वाजेच्या सुमारास त्यांचा अपघाती मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच गस्त पथकाने घटनास्थळी धाव घेतली. जखमी अवस्थेत असलेल्या जुनोमनी यांना ताततडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं, याबाबतची माहिती जाखलाबांधा पोलीस ठाण्याच्या प्रभारी पवन कालिता यांनी दिली आहे.

उत्तर प्रदेशामधून येत असलेला कंटनेर ट्रक पोलिसांनी जप्त केलं आहे. तर अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला आहे. नागांव पोलीस ठाण्याच्या पोलीस अधीक्षक लीना डोले यांनी सकाळी घटनास्थळी जाऊन संपूर्ण माहिती घेतली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply