Konkan Rain: कोकणात अतिवृष्टी, परशुराम घाटात दरड कोसळली, प्रशासनाकडून २४X७ नियंत्रण कक्षाची स्थापना

Konkan Division Weather : प्रादेशिक हवामान विभागाने कोकण विभागात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस होणार असल्याची सुचना दिली. या अनुषंगाने कोकण विभाग महसूल आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी आज आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात आढावा बैठक घेतली.

या बैठकीस कोकण विभागातील सर्व जिल्हाधिकारी, निवासी उप जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना जिल्हा आणि तालुका पातळीवर सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना दिल्या.

Crime News : अंगावर चिखल उडाला म्हणून वाद; दहा ते बारा जणांनी कोयत्यांनी केली वाहनांची तोडफोड

कोकण विभागातील ठाणे, पालघर व रायगड जिल्यातील कुंडलिका, अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास, गाढी, सुर्या, वैतरणा पिजाळ, काळू तसेच रत्नगिरी जिल्हयातील जगबुडी, वाशिष्ठी, शास्त्री, सोनवी, काजळी, कोदवली, मुचकुंदी, बावनदी या नद्या इशारा पातळी ओलांडून वाहत आहेत. या नद्यांच्या किनाऱ्या जवळ राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

बदलापूर तालुक्यातील सोनिवली व हेंद्रेपाडा येथील सुमारे 200 कुटुंबांना, कल्याण तालुक्यातील मोरया नगर, कांबा येथील 60 कुटुंबांना, रत्नागिरीतील मिरजोळी जुवाड येथील 19 कुटुंबांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले आहे. परशुराम घाटात एक मार्गावर दरड कोसळली असून माती दूर करण्याचे काम सुरु आहे.कोकणात दरड कोसळण्याच्या घटना दरवर्षी घडत असल्याने याबाबत नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. जनतेने अफवांर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही करण्यात येत आहे.

यावेळी कल्याणकर यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की," वाढत्या पावसामुळे नद्यांना येणारे पूर, भूस्खलन, दरडी कोसळणे, सखल भागात पाणी साचणे, या नैसर्गिक आपत्तींपासून नागरिकांचे संरक्षण कसे करता येईल याबाबत उपाय योजना तातडीने कराव्यात. पूर प्रवण क्षेत्रातून नागरीकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात याव्यात.

त्यासाठी लागणारी साधन सामग्री तसेच मनुष्यबळ उपलब्ध असल्याची खात्री करावी. प्रत्येक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्‍चीत करण्यात आली असून, या काळात मुख्यालय न सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व स्थानिक पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ अधिका-यांच्या संपर्कात नियंत्रण कक्ष असणार आहे, पावसाळ्यात महापालिका प्रशासनाची कशी तयारी असणार आहे.

याची सर्व माहिती संकलीत करण्यात आली आहे. आपत्तीकाळात संपर्क साधावयाच्या अधिका-यांची नावे व संपर्क क्रमांकांचा समावेश करण्यात आला आहे."

"विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर म्हणाले, संभाव्य नैसर्गिक आपत्ती लक्षात घेता सर्व यंत्रणांनी आपल्या विभागाने आपत्ती निवारणासाठी सज्ज रहावे. तसेच प्रत्येक विभागाने चोवीस तास नियंत्रण कक्षाची स्थापना करुन त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी समन्वय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी

पूरप्रवण भागात शोध व बचाव सुस्थितीतील साहित्य साहित्य, पोहोच कराव्यात. जलसंपदा विभागाने धरणांची सुरक्षितता तपासून घ्यावी. धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यापूर्वी नागरिकांना सूचना द्याव्यात," अशा सूचना, विभागीय आयुक्त डॉ. कल्याणकर यांनी बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply