Kolkata : कोलकातामधील 'निर्भया'ला १६१ दिवसांनी मिळाला न्याय; आरोपी संजय रॉय दोषी, कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Kolkata : कोलकाताच्या आरजी कर मेडिकल कॉलेज अ‍ॅन्ड हॉस्पिटलमध्ये एका महिला डॉक्टरवर लैगिंक अत्याचार झाला होता. अत्याचारानंतर डॉक्टरची हत्यादेखील करण्यात आली. या प्रकरणामुळे देशभरात खळबळ माजली होती. १८ जानेवारीला  या अत्याचार-हत्या प्रकरणाची सुनावणी होती. सुनावणीत कोर्टाने या प्रकरणातील आरोपी संजय रॉयला दोषी ठरवले. आरोपीला सोमवारी शिक्षा सुनावण्यात येईल, असे न्यायालयाने सांगितले.

पश्चिम बंगालच्या सियालदह कोर्टाने शनिवार (१८ जानेवारी) कोलकाता डॉक्टर अत्याचार-हत्या प्रकरणाचा निकाल सुनावला. आरोपीच्या विरोधात बीएनएस कलम ६४, ६६, १०३/ १ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे कोर्टाने सांगितले. आरोपी आरजी कर मेडिकल कॉलेज अ‍ॅन्ड हॉस्पिटलमध्ये गेला. तेथे सेमिनार रुममध्ये महिला डॉक्टर आराम करत होती. आरोपीने डॉक्टरवर हल्ला करुन लैंगिक अत्याचार केला आणि त्यानंतर तिची हत्या केली.

Baramati : निर्दयी बाप! अभ्यास करत नाही म्हणून केली ९ वर्षाच्या लेकाची हत्या, बारामतीमधील धक्कादायक घटना

मागच्या वर्षी ९ ऑगस्ट रोजी ही घटना घडली होती. कोलकाता पोलिसांनी आरोपी संजय रॉयवर ९ ऑगस्ट २०२४ रोजी डॉक्टरवर अत्याचार करुन हत्या करण्याचा आरोप केला होता. १० ऑगस्ट रोजी पोलिसांनी रॉयला अटक केली होती. कोलकाता उच्च न्यायालयाने हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण ब्युरोकडे (सीबीआय) सोपवले होते. या प्रकरणी १२ नोव्हेंबरपासून सुनावणी सुरु झाली होती. ५७ दिवसांनंतर सियालदह न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अनिर्बन दास यांनी या गंभीर प्रकरणावर निकाल दिला. कोर्टाच्या निकालावर आरोपीने 'मला खोट्या प्रकरणात अडकवले जात आहे. मी काही केलं नाही. ज्यांनी हे कृत्य केलं, त्यांना मोकळं सोडलं आहे. यात एक आयपीएस अधिकाऱ्याचाही सहभाग आहे' असे म्हटले आहे.

पीडित डॉक्टरच्या पालकांनी या प्रकरणात आणखी लोक सामील असल्याचा दावा केला आहे. गुन्हात इतर लोक सहभागी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अन्य आरोपींनाही अटक करुन न्यायालयात खटला सुरु केला जाईल अशी त्यांना आशा आहे. या प्रकरणामुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply