Kolhapur Protest : आक्षेपार्ह पोस्टमुळे कोल्हापूरात आंदोलन चिघळलं, इंटरनेट सेवा उद्या संध्याकाळपर्यंत बंद

Kolhapur : कोल्हापुरात शिवराज्याभिषेक दिनी आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेच्या निषेधार्थ कोल्हापूरमध्ये  आज हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक होत कोल्हापूर बंदची हाक दिली.

त्यानंतर या संघटनांनी मोर्चा काढत शिवाजी चौकात मोठी गर्दी केली. पण या आंदोलनादरम्यान दगडफेकीची घटना घडली. त्यानंतर आंदोलक आक्रमक झाले. या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. या घटनेनंतर आता कोल्हापूरातील इंटरनेट सेवा (Internet Services) बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राष्ट्रपुरुषांचा अवमान करणारे आक्षेपार्ह स्टेटस सोशल मीडियावर टाकल्यामुळे कोल्हापूर शहरात तणाव निर्माण झाला आहे. असे स्टेटस ठेवणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी करत कोल्हापूरातील हिंदुत्ववादी संघटना एकवटल्या आहेत. कारवाईचे ठोस आश्वासन न मिळाल्याने संतप्त जमावाने रस्त्यावर उतरत ठिय्या आंदोलन केले. कोल्हापूरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी करत आंदोलन केले.

कोल्हापूरातील दुकानं देखील आज बंद ठेवण्यात आली आहेत. हिंदुत्ववादी संघटनांच्या आंदोलनामुळे कोल्हापूरमध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अशामध्ये पोलिसांनी या हिंदुत्ववादी संघटनांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. पण आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यांनी कोल्हापूरात ठिकठिकाणी मोठी गर्दी करत आंदोलन केले. याच आंदोलनादरम्यान, मटण मार्केट परिसरात दगडफेकीची घटना घडली. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज करत जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला.

दगडफेकी प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. या आंदोनानंतर कोल्हापूरातील इंटरनेट सेवा उद्या संध्याकाळपर्यंत बंद करण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला आहे. यावेळी पोलिसांनी कोणत्याही अफवांना बळी पडून नका. दगडफेक करणाऱ्यांवर कडक कवारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसंच, जमाव बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवरर देखील कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply