Kolhapur News : अनधिकृत मदरसे आणि प्रार्थना स्थळांवर कायदेशीर कारवाई करा; हिंदुत्ववादी संघटनांची मागणी

Kolhapur News : कोल्हापूर शहरालगत असणाऱ्या लक्षतीर्थ वसाहत इथं अनधिकृत मदरसा आणि प्रार्थना स्थळ बांधण्यात आल्याची तक्रार हिंदुत्ववादी संघटनांनी महानगरपालिकेकडे केली होती. या पार्श्वभूमीवर आज बुधवारी सकाळी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तामध्ये अनधिकृत मदरसे आणि प्रार्थना स्थळांना टाळ ठोकलं. मात्र महानगरपालिकेने या अनधिकृत मदरसे आणि प्रार्थना स्थळांवर कायदेशीर कारवाई का केली नाही, असा जाब विचारत हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेत एकच गोंधळ उडाला. 

अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाईची मागणी

कोल्हापूर शहरानजीकच लक्षतीर्थ वसाहत आहे. या वसाहतीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून बेकायदेशीररित्या अनधिकृत मदरसा आणि धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्था उभ्या केल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांमधून येत होत्या. हीच तक्रार हिंदुत्ववादी संघटनांनी कोल्हापूर महानगरपालिकेकडे केली. त्यानंतर अनधिकृत बांधण्यात आलेल्या या धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.

Pune Lohegaon Airport : पुण्यात लोहगाव विमानतळाच्या भिंतीजवळ १० सिलिंडरचे स्फोट

आज बुधवारी सकाळी मोठा पोलीस फाटा घेऊन महानगरपालिकेचे काही अधिकारी लक्षतीर्थ वसाहत इथे जाऊन या अनधिकृत मदरसे आणि प्रार्थना स्थळांची पाहणी केली. तसेच त्या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांना हे मदरसे बंद करण्याच्या सूचना केल्या. 

महापालिका अधिकाऱ्यांनी या अनधिकृत धार्मिक स्थळांवर कोणतीच कारवाई केली नसल्याचं हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना समजले. एवढा मोठा पोलीस फाटा घेऊन अधिकाऱ्यांनी लक्षतीर्थ वसाहतीत जाऊन नेमकं काय केलं? असा जाब महापालिका आयुक्त के.मंजूलक्ष्मी यांना विचारण्यात आला. यावेळी काही अधिकाऱ्यांनी उडवा उडवीची उत्तर दिल्याने एकच गोंधळ उडाला.

महापालिकेने लवकरात लवकर कोल्हापूर शहरातील सर्व अनधिकृत धार्मिक स्थळांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी आज केलेली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply