Kolhapur News : कोल्हापुरात अवैध गर्भलिंग निदान; दवाखान्यावर छापा टाकत डॉक्टर महिलेसह तिघांना अटक

Kolhapur News : कोल्हापुरातल्या कळंबा येथील श्रद्धा हॉस्पिटल मधील अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने पर्दाफाश केला आहे. तसेच गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या दोन महिलांनाही वरणगे पाडळी येथून अटक केली असून संशयितांकडून गर्भपाताच्या गोळ्या जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.

गर्भलिंग निदान चाचणी व गर्भपात करणे कायद्याने गुन्हा आहे. तरी देखील अनेक दवाखान्यांमध्ये अवैधपणे गर्भलिंग निदान करून गर्भपात करण्यात येत असतो. अशाच प्रकारे कोल्हापुरातील कळंबा परिसरात गर्भलिंग निदान करण्यात येत असलेल्या श्रद्धा हॉस्पिटलमध्ये गर्भलिंग निदान करण्यात असल्याचा प्रकार सुरु होता. दरम्यान जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या पथकाने छापा टाकत रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

Mumbai Crime : शिवी दिल्याने तरुणाची सटकली, मित्रालाच जिवानिशी मारलं

गर्भपाताच्या दिल्या जात होत्या गोळ्या

गर्भपाताच्या गोळ्या देणाऱ्या बीएएमएस महिला डॉक्टरच्या दवाखान्यावर जिल्हा परिषद आरोग्य विभागाने बुधवारी सायंकाळी छापा टाकला. यामध्ये डॉ. दिपाली सुभाष ताईंगडे हिला ताब्यात घेण्यात आले. तर पथकाने रोख रकमेसह गर्भपाताच्या गोळ्यांचे पाच किट जप्त केले आहेत. तर कोल्हापूर जिल्ह्यातील वरणगे पाडळीत वरणगे इथे या दोन महिला गर्भपाताच्या गोळ्या विकत असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने वरणगे इथल्या एका घरात सापळा रचला.

महिला डॉक्टरसह दोन महिलांना अटक

दरम्यान आरोग्य विभागाच्या पथकाला मिळालेल्या माहितीवरून वरणगे येथे देखील छापा टाकला. याठिकाणी गर्भपाताच्या गोळ्या देणाऱ्या सुप्रिया संतोष माने आणि धनश्री अरुण भोसले या दोघींनाही पथकाने पकडले. सुप्रिया माने आणि धनश्री भोसले यांना गोळ्यांची विक्री करताना तीन किटसह पकडण्यात आले. तसेच श्रद्धा हॉस्पिटलच्या डॉ. दिपाली ताईगडे याना देखील अटक केली असून तिघींना न्यायालयात हजर केले जाणार असून याप्रकरणी करवीर पोलीस अधिक तपास करत असून आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच अवैध गर्भलिंग निदान सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार सुरू असल्याचं निदर्शनास आले आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply