Kolhapur News : विजेच्या धक्क्याने पोटच्या दोन्ही मुलांचा मृत्यू; ५ दिवस पाण्याचा थेंबही घेतला नाही...मुलांच्या विरहाने माऊलीनेही सोडले प्राण

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील कोपर्डे येथील स्वप्नील कृष्णा पाटील आणि सुहास कृष्णा पाटील हे दोघं सख्खे भाऊ 3 जुलै रोजी शिवारात गेले होते. शिवारात काम करत असताना विद्युत तारेचा स्पर्श होऊन या दोघा तुरुणांचा मृत्यू झाला होता. महावितरणच्या गलथान कारभाराचे ते बळी ठरले आहेत. आपल्या दोन्ही तरुण मुलांचा मृत्यूच्या घटनेचा त्यांची आई नंदाताई कृष्णा पाटील यांना बसला. पोटच्या दोन्ही मुलांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्यामुळे या धक्क्यातून त्यांना सावरता आलं नाही आणि आज त्यांनी आपल्या लेकरांसाठी अखेरचा श्वास घेतला. संपूर्ण जिल्ह्यात या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

पोटची दोन्ही मुलं अगदी ऐन तारुण्यात आलेली, कमावती गतप्राण झाली. आणि हा धक्का आई नंदाताई आणि वडील कृष्णा पाटील यांना बसला. त्यांनी गेले पाच दिवस तोंडात पाण्याचा थेंब ही घेतला नाही. आई नंदाताई यांनी काल अखेरचा श्वास घेतला. या दुर्दैवी घटनेने कोपर्डे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Nashik Crime : मित्रांनीच केला मित्राचा घात, गंजमाळ परिसरातील 'त्या' प्रकरणाचा अखेर उलगडा, तिघांना बेड्या

5 दिवसांपूर्वी कोपार्डे गावात सायंकाळी 4 च्या सुमारास कृष्णा आणि स्वप्नील शिवारात कामासाठी गेले होते. शेतात काम करत असताना चुकून विद्युत खांबाला त्यांचा स्पर्श झाला आणि त्यांना विजेचा धक्का बसला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि ग्रामस्थांनी शिवारात धाव घेतली. मात्र, तोपर्यंत दोघांचाही मृत्यू झाला होता. घराती दोन्ही करती सवरत्या मुलं गेल्यामुळे पाटील कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

 


विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *