Kolhapur Market Committee Election : कोल्हापूरातून ठिणगी; 'राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडी' ला उद्धव ठाकरे गटाचा 'जय महाराष्ट्र'

Kolhapur APMC Election  : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट) यांच्यातील राजकीय वैर आता कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत इरेला पेटल्याचे दिसून आले. ठाकरे गटाने आज (शुक्रवार) राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीत शिंदे गट असल्याने आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी जाहीर केला.

जिल्हा प्रमुख संजय पवार म्हणाले आमचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर वार करणाऱ्या शिंदे गटा सोबत आम्ही जाणार नाही. अशा 100 बाजार समिती आम्ही सोडू पण शिंदे गटा सोबत जाणार नाही.

जिल्हा प्रमुख विजय देवणे म्हणाले बाजार समितीच्या आता पर्यंत जाहीर झालेल्या पॅनलमध्ये उद्धव ठाकरे शिवसेना गटाचा कोणताही संबंध नाही. या निवडणुकीत आम्ही तटस्थ राहणार आहाेत. आमची भूमिका ठाम असल्याचे पवार आणि देवणे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान राज्यातील राजकारणाचे पडसाद हे काेल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पाहवयास मिळू लागले आहे. आता बाजार समितीत काेणत्या आघाडीला जास्त (एकूण 18 उमेदवार) जागा मिळणार हे निकालानंतर स्पष्ट हाेईल.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply