Kolhapur Crime : सख्ख्या भावाने केली बहिणीची हत्या; त्याने रक्ताने पोत्यावर दोन नावं लिहिली

कोल्हापूरः कोल्हापूरमधून एक धक्कदायक बातमी पुढे येत आहे. सख्ख्या भावने बहिणीची कोयत्याने हत्या केल्यााच प्रकार उघड झाला असून घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रक्ताने माखलेला कोयता घेऊन एक तरुण रस्त्याने फिरत होता. पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर त्याला तातडीने ताब्यात घेण्यात आलेलं आहे. त्याच तरुणाच्या सांगण्यानुसार त्याने सख्ख्या बहिणीचा खून केला.

या घटनेने पोलिस प्रशासन खडबडून जागं झालं आहे. पोलिसांना अद्याप तरुणीचा मृतदेह मिळालेला नाही. बहिणीचा खून केल्यानंतर तरुणाने पोत्यावर रक्ताने गीता-प्रताप असं लिहिल्याचं सांगितलं जात आहे.पोलिस सध्या सदर तरुणाची कसून चौकशी करीत आहेत. हा तरुण नशेत असल्याचं सांगण्यात येतंय. पोलिस तरुणीच्या मृतदेहाचा शोध घेत असून भावाने पोत्यावर लिहिलेल्या गीता-प्रताप नावाचा उलगडा पोलिस करीत आहेत.

कोल्हापुरात ही घटना घडलेली असतांना आणखी एक खूनाचा प्रकार घडला आहे. पतीनेच मारहाण करुन पत्नीचा खून केला असून मुलाच्या हव्यासापोटी पत्नीचा काटा काढण्याची माहिती आहे. विशेष म्हणजे पत्नीचा खून करुन त्याने शॉक लागल्याचा बनाव केला. पत्नीचं नाव अश्विनी होतं तर पतीचं नाव एकनाथ पाटील असं आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply