Kolhapur Accident News : स्टेअरिंगमध्ये बिघाड झाल्याने बसचा अपघात; अनेक प्रवासी जखमी; कोल्हापुरातील घटना

Kolhapur Accident News : कोल्हापूरमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. कोल्हापुरातील कुरुंदवाड आगाराहून गणेशवाडीला जाणाऱ्या बसला अपघात झाला. या अपघातात शाळकरी विद्यार्थ्यांसह अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. एसटीच्या स्टेअरिंगमध्ये बिघाड होऊन चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,कोल्हापुरातील  कुरुंदवाड आगाराहून गणेशवाडीला जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. शिरोळ तालुक्यातील शेडशाळ माळभाग ही घटना घडली. अचानक समोरून येणाऱ्या वाहनाला रस्ता देताना बसच्या स्टेरिंग मध्ये बिघाड झाल्याने चालकाचा ताबा सुटला.

Dhule LCB Action : सव्वादोन लाखांचा गुटखा जप्त; धुळे एलसीबीची कारवाई

यानंतर बस थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या चारीमध्ये जाऊन अडकली. अपघातावेळी बसमध्ये  विद्यार्थ्यांसह ४७ प्रवासी होते. यामधील अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातानंतर स्थानिकांनी धाव घेत प्रवाशांना बाहेर काढले. अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply