Kirit Somaiya : किरीट सोमय्यांच्या कथित व्हिडीओ प्रकरणाच्या तपासाला सुरुवात; मुंबई गुन्हे शाखेकडे जबाबदारी

मुंबई : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कथित व्हायरल व्हिडीओ प्रकरणी मुंबई पोलिसांच्या मुंबई गुन्हे शाखेने तपास सुरू केला आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 10 चे पथक व्हिडीओच्या सत्यतेचा तपास करणार आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी गुन्हे शाखेचे अधिकारी तांत्रिक तज्ज्ञ आणि सायबर टीमची मदत घेणार आहेत.

आज विधानसभेत कथित व्हिडीओचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर मुंबई पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले असून त्यांनी तपास सुरू केला आहे. यापूर्वी महिला आयोगाने मुंबई पोलीस आयुक्तांना या प्रकरणी पत्र लिहून अहवाल मागवला आहे.

राज्य महिला आयोगही किरीट सोमय्या कथित व्हिडीओ प्रकरणात सक्रिय झाला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. महिला आयोगाकडून मुंबईच्या पोलीस आयुक्तांना पत्र पाठवण्यात आले आहे. या प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी करुन वस्तुस्थिती दर्शक अहवाल सादर करण्याच्या सूचना महिला आयोगाकडून पोलिसांना देण्यात आल्या आहेत. मुंबई पोलिसांचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाईचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे आयोगाने म्हटले आहे.

Kirit Somaiya : 'किरीट सोमय्या प्रकरणाची चौकशी करुन अहवाल द्या' महिला आयोगाचं पोलिस आयुक्तांना पत्र

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत कथित व्हायरल व्हिडिओ प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे. मी कोणत्याही महिलेवर अत्याचार केलेला नाही, व्हिडीओची सत्यता तपासून घ्यावी, अशी विनंती किरीट सोमय्या यांनी केली आहे. माझ्याकडून कोणत्याही महिलेवर असा अत्याचार झालेला नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. त्यामुळे अशा सर्व आरोपांची आपण चौकशी करावी, अशी मागणी सोमय्या यांनी मागणी केली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply