King Charles III : ब्रिटनला मिळणार नवा राजा; ७० वर्षानंतर होणार शाही सोहळा

King Charles III : राजे चार्ल्स तिसरे हे आज (ता.६) राज्याभिषेकानंतर ब्रिटनचे अधिकृत राजे जगभरात ओळखले जाणार आहेत. चार्ल्स यांचा राज्याभिषेक स्थानिक वेळेनुसार सकाळी ११ वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी साडेचार) होणार आहे.

राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे निधन ८ सप्टेंबरला २०२२ रोजी झाले. ब्रिटिश उत्तराधिकार कायद्यांनुसार कोणत्याही समारंभानुसार राजघराण्याचे सिंहासन त्यांचे पुत्र चार्ल्स यांच्याकडे आले आहे. ब्रिटिश कायद्यानुसार आधीचा राजा किंवा राणीच्या मृत्यूनंतर त्यांचा उत्तराधिकारी लगेचच राजा किंवा राणी बनतात. देशाला राजा किंवा राणी नाही, असे कधीही होत नाही.

राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या मृत्यूच्या दोन दिवसांनंतर राज्याभिषेकाची अधिकृत प्रक्रिया १० सप्टेंबरपासून सुरू झाली होती. त्यावेळी राजे चार्ल्स तिसरे यांची राजा म्हणून घोषणा करण्‍यासाठी सेंट जेम्स पॅलेसमध्ये राज्यारोहण परिषद बैठक झाली होती. ‘प्रिव्ही कौन्सिल’ नावाचा हा समारंभ नव्या राजाच्या पहिला अधिकृत समारंभ होता. चार्ल्स यांनी त्यावेळी स्कॉटलंडचे चर्च सुरक्षित ठेवण्याची शपथ घेतली होती. यानंतर त्यांनी उत्तर आयर्लंड आणि वेल्सच्या भेट देत राजा बनण्याच्या त्यांच्या विविध टप्प्यांना सुरुवात केली. ब्रिटिश क्राउनच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीनुसार राज्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर शोकाचा कालावधी संपल्यानंतर नव्या राजाचा अधिकृत राज्याभिषेक होतो. राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे पिता राजे जॉर्ज पाचवे यांचा मृत्यू ६ फेब्रुवारी १९५२ रोजी झाला. त्यानंतर १६ महिन्यांनी २ जून १९५३ एलिझाबेथ राजगादीवर विराजमान झाल्या होत्या.

शाही सोहळ्यातील पाहुणे

२,२०० पाहुणे उपस्थित राहणार

राणी एलिझाबेथ यांच्या राज्याभिषेक सुमारे आठ हजार पाहुण्यांच्या उपस्थित झाला होता

चार्ल्स यांचे पुत्र प्रिन्स हॅरी यांच्यासह राजघराण्यातील कुटुंब सोहळ्यात सहभागी होणार

अन्य देशांचे राजे, अध्यक्ष, मंत्र्यांनाही निमंत्रण

भारताकडून उपराष्ट्रपती जगदीप धनकड हे प्रतिनिधित्व करणार

अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या पत्नी जिल बायडेन, चीनचे उपराष्ट्रपती हान झेंग हेही सहभागी होण्याची शक्यता

अभिनेत्री सोनम कपूर, हॉलिवूड कलाकार टॉम क्रूझ, गायक टॉम जोन्स, रॉबी विल्यम्स यांच्यासह एल्टन जॉन, बेअर ग्रिल आदी निमंत्रित



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply