kharghar heat stroke : 'खारघर दुर्घटनेची न्यायालयीन ‌चौकशी करावी...' विरोधी पक्षनेते अजित पवार यांची राज्यपालांकडे मागणी

kharghar heat stroke : खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण या कार्यक्रमात मृत्यूमुखी पडलेल्या श्री सदस्यांच्या मृत्यू प्रकरणी राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापताना दिसून येत आहे. या प्रकरणी विधिमंडळाचे दोन दिवसाचे विशेष अधिवेशन घेण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून करण्यात आलेली आहे.

त्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही याबाबत आक्रमक भूमिका घेत या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी राज्यपालांकडे केली आहे. या संबंधीचे पत्र अजित पवार यांनी राज्यपालांना लिहल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, खारघरमधील महाराष्ट्र भूषण कार्यक्रम सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. या संबंधीचे पत्र ते राज्यपालांना पाठवणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.

या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर शासकिय यंत्रणा राबविण्यात आली; मात्र त्याचा खर्च दाखवण्यात आला नाही याची ही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी या पत्रामधून करण्यात येणार आहे. तत्पुर्वी, या दुर्घटनेसंबंधी याआधी अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांनाही पत्र लिहले होते. तसेच या दुर्घटनेतील जखमींचीही त्यांनी रुग्णालयात जावून भेट घेतली होती.

काय आहे नेमके प्रकरण?

खारघर येथील सेंट्रल पार्क मैदानावर महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी (ता. 16 एप्रिल) महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या हस्ते देण्यात आला. पण यावेळी श्री सदस्यांना उन्हात बसविण्यात आल्याने एकूण 14 श्री सदस्यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला. पण आता या प्रकरणी राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply