Pune : खराडीतील पुलाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह! जॅकवेल बंधाऱ्यावरील पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी वाढली

Kharadi : केशवनगर आणि खराडी या भागांना जोडणारा जॅकवेल बंधारा पाणी अडविण्याच्या उद्देशाने बांधण्यात आला होता. परिसरात नागरी वस्ती वाढल्याने आता त्यावरून त्यावेळी अपेक्षितपेक्षा अधिक वाहतूक होत आहे. त्यामुळे वाहतुकीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा पूल योग्य की अयोग्य याविषयी जनसामान्यांना माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळे या बंधाऱ्यावरील पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट होणे गरजेचे आहे, अशी मागणी नागरिक करत आहेत.

जॅकवेल बंधारा पुलाच्या वरील भागातील सिमेंटचा चार इंची थर पुरामुळे उखडला आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून पुलावरील रस्ता उंच-सखल झाला आहे. पुलाचे संरक्षण कठड्यांसाठी उभे केलेले सिमेंटचे खांब काही ठिकाणी तुटले आहेत. त्यामुळे येथून जाताना वाहनांची गती संथ होते. त्यामुळे संपूर्ण पुलावर वाहनांची रांग लागलेली असते. त्यामुळे एकाचवेळी आलेल्या वाहनांचे क्षमतेपेक्षा अधिक वजन पुलावर पडत आहे. त्यामुळे पुलाच्या क्षमतेबाबत पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे आवश्यक आहे. याबाबत हडपसर-मुंढवा क्षेत्रिय कार्यालयाचे सहायक आयुक्त बाळासाहेब ढवळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होवू शकला नाही.

Matheran : माथेरानमध्ये मोठी कारवाई! सुमारे 400 घोडे झाले बेघर; पोलिस बंदोबस्तात कारवाई, अश्वपाल बांधवांचा आक्रोश

केशवनगर व मुंढवा परिसरामध्ये वारंवार वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे मांजरी व केशवनगर येथून मुंढवामार्गे खराडी येथे जाताना वाहतूक किमान दोन तास अडकून पडते. त्यामुळे वाहनचालक जवळचा आणि कोंडी विरहीत जॅकवेल बंधाऱ्यावरील पुलाचा वापर करतात. त्यामुळे वाहतुकीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा पूल योग्य की अयोग्य याविषयी जनसामान्यांना माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळे या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट लवकरात लवकर होणे आवश्यक आहे.

कुंडमळा येथे नदीवरील पूल कोसळल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जुने पूल वाहतुकीसाठी योग्य आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने या पुलाच्या दुरुस्तीसह स्ट्रक्चरल ऑडीट करण्याची गरज आहे.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *