Khadakwasla Dam : दिलासायदायक! पुण्यातील धरणसाखळीत पावसाची संततधार; पाणीसाठा वाढला, ताजी आकडेवारी आली समोर

Khadakwasla Dam : पुणेकरांसाठी दिलासादायक वृत्त हाती आलं आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण साखळी क्षेत्रात मागील आठवड्याभरापासून पावसाची संततधार सुरु आहे. या संततधार पावसामुळे धरण क्षेत्रातील पाणीसाठा वाढला आहे. हा पाणीसाठा दोन टीएमसीने वाढला आहे.
 
पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चारही धराणात एक महिना पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक होता. काही दिवसांपूर्वी या चारही धरणात ३.५० टीएमसी पाणी शिल्लक होता. त्यामुळे पुणेकरांची चिंता वाढली होती. त्यानंतर कोसळलेल्या पावसामुळे बुधवारी चार धरणांचा पाणीसाठा ४.९९ टीएमसी झाला होता. त्यानंतर आज रविवारीपर्यंत पाणीसाठा हा ५.८७ इतका झाला आहे. पाणीसाठ्यात वाढ होऊ लागल्याने पुणेकरांना दिलासा मिळत आहे.
 पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरण साखळी क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून पावसांची संततधार सुरु आहे. यामुळे गेल्या सहा दिवसांत खडकवासला धरण साखळी क्षेत्रातील पाणीसाठा 2 टीएमसीने वाढला आहे. खडकवासला धरण सापेक्षेत्रातील टेमघर, वरसगाव,पानशेत खडकवासला धरण साखळी क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे चारही धरणात मिळून पुणे शहराला एक महिना पुरेल इतका पाणीसाठा वाढला आहे.

पुणेकरांची पाणीचिंता मिटणार?

चारही धरणातील २५ जूनच्या पाणीसाठ्याने चिंता वाढवली होती. या चारही धरणात पाणीसाठ्यात घट झाल्याने पुणेकरांना पाणीचिंता सतावत होती. या पाणीसाठ्यामुळे पुणेकरांवर पाणीकपातीची टांगती होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून चारही धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरु आहे. त्यात पाणीसाठ्यातही वाढ होत आहे. यामुळे पुणेकरांची पाणीचिंता लवकरच मिटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

भंडारदरा परिसरात पावसाचा जोर

अहमनगरमधील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोरवाढला आहे. सततच्या पावसामुळे अकराशे टीएमसी क्षमता असलेल्या भंडारदरा धरणाचा पाणीसाठा २४ टक्क्यापर्यंत पोहोचला आहे. गेल्या २४ तासात अर्धा टीएमसी पाण्याची विक्रमी आवक वाढली आहे. ५२१ दशलक्ष घनफूट पाणी धरणात नव्याने दाखल झाले आहे. यामुळे धरण परिसरातील भात लागवडीला वेग आला आहे.

भंडारदरा परिसरातील आदिवासी बांधवही भात लागवडीत व्यग्र झाला आहे. संततधार पावसामुळे या परिसरातील छोटे-मोठे धबधबे प्रवाहित झाले आहेत. पावसामुळे सर्वत्र हिरवळ पसरली आहे. यामुळे अनेक पर्यटकांसाठी भंडारदरा धरण परिसर आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे.
 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply