Sinhagad Ghat : सिंहगडावर जाणाऱ्या पर्यटकांसह वाहनांसाठी महत्त्वाची बातमी; वन विभागानं घेतला 'हा' निर्णय, काय आहे जाणून घ्या..

Khadakwasla : सिंहगडावर पर्यटकांची (Tourists) वाढती गर्दी पाहता, सुट्टीच्या दिवशी घाटात शेवटच्या टप्प्यातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वन विभाग  गडावर सोडण्यात येणारी वाहतूक टप्प्याटप्प्याने सोडण्याचे नियोजन करीत आहे. याबाबत वन विभागाने घेरा सिंहगड वन व्यवस्थापन समितीला सूचना केल्या आहेत.
सिंहगड घाटातील (Sinhagad Ghat) शेवटच्या तीन किलोमीटरमध्ये रविवारी (ता. १६) नियोजन फसल्याने सुमारे चार तासाहून अधिक काळ गड वाहतुकीसाठी बंद होता. तसेच सोमवारी सुट्टी असल्याने गर्दी झाली होती. परिणामी, वाहतूक कोंडी झाली होती. सिंहगड घाटातील वाहतुकीचे नियोजन घेरा सिंहगड वनसंरक्षण समिती (Sinhagad Forest Conservation Committee) करते. समितीकडून त्याबाबत वेळेत योग्य निर्णय न घेतल्याने अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली होती.

Bomb Threat In Mumbai : मुंबई पालिका मुख्यालयासह, महाविद्यालये अन् विमानतळाला बॉम्बने उडवून देऊ, अज्ञात व्यक्तीकडून पुन्हा धमकी

 यामुळे वन विभाग खडबडून जागे झाले. त्यानी सुरळीत वाहतुकीसाठी घाटातील वाहतुकीच्या व्यवस्थापनात बदल करण्याच्या सूचना वन समितीला दिल्या आहेत. रविवारी वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांचे हाल झाले. जास्तीत-जास्त पर्यटकाना गडावर जाता यावे, यासाठी वाहतूक कोंडी टाळून सिंहगडावर जाता येईल.

यासाठी समिती नियोजन करीत आहे. सिंहगडावर जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहनांसाठी वेळापत्रक तयार करण्यात येईल. गडावर जाणारी वाहने कोंढणपूर नाका येथे वाहने थांबविणार, त्याचवेळी गडावरील वाहन तळावरून वाहने खाली येतील. कोंढणपूर नाका येथून वाहने गडावर सोडल्यावर वाहन तळावरून एक ही वाहन खाली येणार नाही, असा प्रयोग करण्यात येणार आहे, अशा सूचनाही वन विभागाने वन समितीला केल्या आहेत.
पर्यटकांची संख्या आणि घाटातील वाहनांच्या संख्येचे प्रमाणात तसे वेळापत्रक तयार करणार आहे. या संदर्भात तातडीने त्याची अंमलबजावणी या शनिवारपासून करण्यात येणार आहे. त्यासाठी वन व्यवस्थापन समितीचे स्तरावर त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी संबंधितास आवश्यक ते आदेश आणि सूचना देखील केल्या आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply