Kedarnath Landslide: उत्तराखंडमध्ये मोठी दुर्घटना! केदारनाथच्या गौरीकुंडमध्ये दरड कोसळली; अनेक भाविक दबल्याची भीती

Kedarnath Landslide : उत्तराखंडमधून एक भयानक घटना समोर आली आहे. केदारनाथमध्ये पुन्हा पावसाने धुमाकूळ घातला असून गौरीकुंडमध्ये गुरूवारी (ता.३ ऑगस्ट) रात्रीच्या दरड कोसळल्याची घटना घडली.

या घटनेत दोन दुकाने जमीनदोस्त झाली असून अनेक भाविक १२ ते १३ भाविक दबल्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली असून बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवारी रात्रीच्या सुमारास केदारनाथमध्ये मुसळधार पाऊस सुरू होता. यावेळी गौरीकुंड परिसरातील दुकानात काही भाविक झोपले होते. मध्यरात्रीच्या सुमारास टेकडीवरून अचानक मातीचा ढिगारा दुकानांवर पडला. या मलब्याखाली दोन दुकाने दबून गेली.

Devendra Fadanvis : आळंदीत वारकऱ्यांवर लाठीमार झालाच नाही, देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण; घटनाक्रमही सांगितला

या दुकानात झोपलेले १२ ते १३ भाविक मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या बेपत्ता नागरिकांमध्ये काही स्थानिक नागरिकांसह नेपाळी नागरिकांचाही समावेश आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच एनडीआयएफचं पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्यास सुरूवात झाली आहे.

गौरीकुंड आणि सोनप्रयाग परिसरात गुरुवारी रात्रीपासूनच जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे गौरीकुंड परिसरातील मंदाकिनी नदी दुथडीभरुन वाहत आहे. सतत पाऊस कोसळत असल्याने बचावकार्यात अडथळा येत आहे.

सध्या बचावकार्य बंद असून पाऊस थांबल्यानंतरच बचावकार्य सुरु करण्यात येणार असल्याची माहिती बचावपथकाकडून देण्यात आली आहे. गौरीकुंड हा भाग चारधाम यात्रेतील अतिशय महत्त्वाचा टप्पा असून, त्याचं नाव पार्वतीच्या नावावरून ठेवम्यात आलं आहे. केदारनाथ मंदिराच्या मार्गावर जाण्यासाठी गौरीकुंड प्रमुख तळांपैकी एक आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply