Katraj Rain : कात्रज परिसरात पावसाची जोरादार हजेरी; पेशवे जलाशय पूर्ण क्षमतेने भरले

Pune Rain : कात्रज - कात्रजसह डोंगरमाथ्यावर व परिसरात मागील २४ तासात पावसाने जोरदार हजेरी लावली. दोन-तीन दिवसांपासून संततधार आणि मागील काही तासापासून जोरदार सुरू असलेल्या पावसाने रस्त्यांना ओढे-नाल्याचे स्वरूप आल्याचे चित्र दिसत आहे

कात्रज डोंगरमाथा व घाट परिसरात पडलेल्या पावसाचे पाणी वाहून आणणारे गुजरवाडी ओढा व मांगडेवाडी ओढा पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहेत. कात्रज येथील नानासाहेब पेशवे जलाशय पूर्ण क्षमतेने भरला असून पाटबंधारे विभागाने पूर्ण क्षमतेने विसर्ग सुरू केला आहे.

Pune Rain : मुसळधार पावसाने पुणेकरांचे हाल! टपरी हलवताना करंट लागून तिघांचा मृत्यू; ताम्हिणी घाटात दरड कोसळून १ ठार

कात्रज तलावातुन ओढ्यात मोठ्या प्रमाणात फांद्या वाहून येत होत्या. त्यामुळे मुख्य प्रवाहास अडथळा येत होता. स्थानिकांनी त्या फांद्या हटवून प्रवाह सुरळित केला. नवीन वसाहत येथील नाल्यातून राजीव गांधी प्राणीसंग्रहालय पासून पुढे आंबील ओढ्यामधून पाणी पुढे जाते त्यामुळे पालिका प्रशासनाकडून पाहणी करत नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले.

कात्रजसह गुजर-निंबाळकरवाडी, भिलारेवाडी पाझर तलाव तुडुंब

-सांडव्यातून पूर्ण क्षमतेने पाणी सुरु

-कात्रज, कोंढवा, टिळेकरनगर, येवलेवाडी, कोंढवा रोड, गोकुळनगर, भारती विद्यापीठ, गुजर-निंब मांगडेवाडी, भिलारेवाडी परिसरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांना ओढे नाले याचे स्वरुप

-कात्रज-कोंढवा रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने वाहतूक मंदावली

-कात्रज-मांगडेवाडी रस्त्यावरील खाजगी कंपनीची भिंत कोसळून एका चारचाकीचे नुकसान

माऊली नगर येथे नागरिकांच्या घरात पाणी शिरले.

लेक टाऊन, महालक्ष्मीनगर सोसायटी येथे झाड कोसळल्याची घटना

राजस आणि उत्कर्ष सासायची परिसराती दिवसभर विजपुरवठा खंडित

-राजस सोसायटी चौकाला तळ्याचे स्वरूप



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply