Kasba-Chinchwad Result : कसब्यात मविआ तर चिंचवडमध्ये BJP आघाडीवर

गेल्या महिन्याभरापासून प्रचंड चर्चेत राहिलेल्या कसबा आणि पिंपरी-चिंचवड या पुण्यातील दोन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. 

कसब्यातील दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील व्यक्तींना उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त होत असताना भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे तर मविआकडुन रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली कसब्यात किंगमेकर कोण ठरतं याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून भाजपच्या अश्विनी जगताप मैदानात आहेत, तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रसेचे नाना काटे निवडणूक रिंगणात आहेत. चिंचवडमधून राहुल कलाटे हे अपक्ष असून, तिरंगी लढत बघायला मिळाली होती.

तिसऱ्या फेरीतही भाजप उमेदवार अश्विनी जगताप आघाडीवर

भाजप उमेदवार अश्विनी जगताप - 7996

महाविकास आघाडी उमेदवार नाना काटे - 7349

अपक्ष उमेदवार राहुल कलाटे - 3046

भाजप उमेदवार अश्विनी जगताप आघाडीवर

चिंचवडमध्ये दुसऱ्या फेरीमध्येही अश्विनी जगताप आघाडीवर आहेत. अश्विनी जगताप यांना 7996, नाना काटेंना 7349 तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना 3046 मतं मिळाली आहेत.

कसबा पेठेत रवींद्र धंगेकरांच वर्चस्व

पुणे पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. कसब्यातून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर 5844 मतांनी आघाडीवर आहेत. तर 2863 मतांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने पिछाडीवर आहेत.

रवींद्र धंगेकर 3000 मतांनी आघाडीवर

कसबा मतदर संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर 3000 मतांनी आघाडीवर आहे. भाजपाचे उमेदवार हेमंत रासने पिछाडीवर.

चिंचवडमध्ये अश्विनी जगताप आघाडीवर

चिंचवडमध्ये अश्विनी जगताप मोठ्या आघाडीवर आहेत. अश्विनी जगताप यांना 4053 मत मिळाली आहेत आणि नाना काटे यांना 3604 मत मिळाली आहेत. तर अपक्ष राहुल कलाटे यांना 1273 मत मिळाली आहेत.

रवींद्र धंगेकर यांची पोस्टल मतमोजणीत आघाडी 

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार उमेदवार रविंद्र धंगेकर पोस्टल मतदानात आघाडीवर असल्याचं समोर आलं आहे.

चिंचवडमध्ये पोस्टल मतमोजणीमध्ये अश्विनी जगताप आघाडीवर

चिंचवडमध्ये पोस्टल मतमोजणीमध्ये अश्विनी जगताप आघाडीवर असल्याचं समोर आलं आहे. पोस्टाने आलेल्या या मतांची मोजणी पहिल्यांदा सुरू झाली यामध्ये भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप आघाडीवर आहेत.

मतमोजणीच्या पहिल्या फेरीत पोस्टल मतं मोजली जाणार

मतमोजणीच्या पहिल्या फेरीत पोस्टल मतं मोजली जाणार

पोस्टल मतांबरोबर इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम मधून देखील मतांची मोजणीला सुरुवात

इव्हीएम मोजणी ८.३० नंतर सुरुवात होणार

संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेल्या पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठीची आज मतमोजणी पार पडणार आहे. सकाळी ८ वाजेपासून या मतमोजणीला सुरूवात होणार आहे. या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दोन्ही जागांवर आपलाच उमेदवार विजयी व्हावा यासाठी भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांपासून ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत अगदी सर्वांनीच मोठा प्रचार केला होता. दुसरीकडे महाविकास आघाडीचे अनेक दिग्गज नेत्यांनी सुद्धा प्रचारात सहभाग घेतला होता. त्यामुळे या दोन्ही जागेवरील निवडणुका चांगल्याच गाजल्या होत्या. दरम्यान, आज या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असून मतपेट्यांमधून कोण बाजी मारणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply