Kasba Bypoll Election : प्रचार रणधुमाळी शिगेला! CM शिंदे मध्यरात्री 2 वाजता कसब्यात

पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूकीचा प्रचार आता शेवटच्या टप्प्यांमध्ये आला आहे. प्रचारासाठी शेवटचे 2 दिवस बाकी आहेत. अशातच भाजपचे अनेक दिग्गज नेते प्रचारासाठी पुण्यात आले होते. भाजपसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, एकनाथ शिंदेंही प्रचारासाठी आले होते.

गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर आहेत. अशातच काल मध्यरात्री 2 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कसबा मतदारसंघात भेट दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील मध्यवर्ती कार्यालयालाही भेट दिली. शिवसेना भवनात भरत गोगावले, नरेश म्हस्के यांच्यासोबत यावेळी बैठक पार पडली. कार्यालयाच्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्री पहिल्यांदाच मध्यवर्ती कार्यालयात आले होते. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे.

तर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पुण्यातील शिवसेनाभवन मध्यवर्ती कार्यालयाची पाहणी केली. या कार्यालयाचं उद्घाटन झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे पहिल्यांदाच मध्यवर्ती कार्यालयात आले होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, “पुण्यातील आमचं कार्यालय बघायला आलो आहे. आमच्या नेत्यांनी इथं मला बोलावलं आणि मी आलो. आमच्या लोकांनी मिळून भव्य कार्यालय उभं केलं आहे. तेच पहायला मी आलो आहे. लोकांचं माझ्यावर प्रेम आहे. त्यामुळे रात्री 2 वाजता देखील एवढी गर्दी दिसत आहे. सगळे लोकं भेटायला आले आहेत. त्यांच्या प्रेमाचा मी ऋणी आहे”, असं एकनाथ शिंदे यावेळी बोलताना म्हणाले आहेत.

तर कसबा पेठ पोटनिवडणूकीच्या प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहचली आहे. आज प्रचारासाठी भाजप व मविआकडून दिगग्ज नेते कसब्यामध्ये असणार आहेत. ठाकरे गटाच्या युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा रोड शो व सभा तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही कसबा आणि चिंचवडमध्ये सभा घेणार आहेत. भाजपसह मविआचे अनेक दिगग्ज नेते आज पुण्यात असणार आहेत. प्रचारासाठी शेवटचे दोन दिवस उरले आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply