Kasaba ByPoll : रविंद्र धंगेकर गिरीश बापटांच्या भेटीला; लागेल ती मदत करण्याचं बापटांचं आश्वासन

पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस नेते रविंद्र धंगेकर यांनी भाजपाच्या हेमंत रासने यांचा पराभव केला. यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान निवडून येताच धंगेकरांनी भाजपा खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली आहे.

या भेटीनंतर धंगेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि भेटीत काय झालं याबद्दल माध्यमांना सांगितलं. धंगेकर म्हणाले, "मी बापटांसोबत दोन वेळा विधानसभा निवडणूक लढवली. पण कधी संघर्ष झाला नाही. खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक झाली. पण सत्ताधारी पक्षाने यंदा खूप चुकीचं राजकारण केलं, पैशाचं राजकारण करत निवडणूक लढली. बापटांनी कधी पैसे वाटले नाही, सर्वसमावेशक प्रेमाने राजकारण केलं, त्यामुळेच जनतेने त्यांच्या पदरात मतं टाकली. "

"बापटांनी माझं अभिनंदन केलं. तू चांगली मेहनत घेतली, त्याचं फळ तुला मिळां असं मह्णाले. नियोजन कर आणि चांगल्या पद्धतीने कामाचा पाठपुरावा कर तुला निश्चित यश मिळेल. तुला अडचण आली, गरज वाटली तर तुला पूर्णपणे मदत करीन. वडीलकीच्या नात्याने त्यांनी सूचना केल्या तेव्हा मन भरून आलं की आपल्या पाठीशी अनेक लोक आहेत. पक्षविरहीत राजकारण करताना त्यांनी कधी माणसं संपवण्याचं कुरघोडीचं राजकारण केलं नाही. विरोधी पक्षातल्या कार्यकर्त्यांनाही त्यांनी ताकद दिल्याचं मी पाहिलं. म्हणून मी त्यांचे आशिर्वाद घेतले, त्यांच्या सूचना पाळेन", असंही रविंद्र धंगेकर पुढे म्हणाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply