
Karjat : कर्जत तालुक्यातील पळसदरी येथील धरणामध्ये एका अज्ञात तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. हा मृतदेह रविवारी दुपारच्या सुमारास बाहेर काढण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, पळसदरी येथील धरणामध्ये दुपारी ३.३०च्या सुमारास एक मृतदेह आढळल्याची माहिती स्थानिक पोलिस पाटील विनायक खोपकर यांनी दिल्यानंतर कर्जत पोलिस घटनास्थळी पोहोचले. हा मृतदेह एका तरुणीचा असल्याचे दिसून आले. पोलिसांनी तत्काळ खोपोली येथील बचाव पथकाला पाचरण करून मृतदेह बाहेर काढला. मृत तरुणीची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही तरुणी इथे कशी व कोणासोबत पोहोचली, तिचा मृत्यू हा अपघात आहे की; घातपात याचा शोध पोलिस घेत आहेत.
धरणामध्ये मृतावस्थेत आढळलेल्या तरुणीची अद्याप ओळख पटली नसली तरी सदर तरुणी कर्जत तालुक्याबाहेरची असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या तरुणीची ओळख पठवण्यासाठी पोलिसांकडून आजूबाजूच्या पोलीस ठाण्यांसोबत संपर्क साधला जात असून बेपत्ता असलेल्या व्यक्तींच्या अनुषंगाने तपास केला जात आहे. तसंच या तरुणीची ओळख पटवण्यासाठी सोशल मीडियाचाही आधार घेतला जात असल्याचे समजते.
व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर तपास
शनिवारी व्हॅलेंटाईन डे होता. या दिवशी अनेक तरुण-तरुणी फिरण्यासाठी बाहेर पडतात. कधीकधी एकतर्फी प्रेमातून वाद होऊन हत्येच्या घटनाही घडत असतात. या पार्श्वभूमीवर व्हॅलेंटाईन डेला सदर तरुणीचा घातपात तर करण्यात आला नाही ना, याबाबतही पोलिसांकडून कसून तपास केला जात आहे. या तरुणीचा मृत्यू नेमका कसा झाला, तिचा खून करण्यात आला की तिने स्वत:हूनच आपलं जीवन संपवलं, याबाबतची माहिती शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

