Kalyan Politics : कागदपत्रांसाठी पैशांची मागणी करणाऱ्या 'लाडक्या भावांना' आवरा; 'लाडकी बहीण योजने'वरून काँग्रेस नेते आक्रमक

Kalyan Politics : राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली आहे . या योजनेतून महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेसाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांसाठी महिलांची धावपळ सुरु आहे. याचदरम्यान, या योजनेच्या कागदपत्रांच्या आडून काही महा ई सेवा केंद्र चालक, काही कर्मचारी पैसे घेत असल्याचा आरोप काँग्रेसचे डोंबिवली जिल्हा अध्यक्ष सचिन पोटे यांनी केला आहे.

महा-ई-सेवा केंद्राकडून या योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांसाठी पैसे मागितल्याचाही आरोप पोटे यांनी केला आहे.लाडकी बहीण योजनेसाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांसाठी पैशांची मागणी करणाऱ्या 'लाडक्या भावांना' आवरा, अशी मागणी पोटे यांनी केली आहे. तसेच या योजनेसाठी महिलांना राष्ट्रीय बँकेत अडीच हजार रुपये खाते उघडण्यासाठी लागतात. त्यामुळे राष्ट्रीय बँकांना झिरो बॅलन्स अकाउंट देण्याचा सूचना करण्याची मागणी पोटे यांनी यावेळी केली.

६ लाख देऊन बनला बोगस आरपीएफ 

रोहन एका व्यक्तीला भेटण्यासाठी मुंबईला आला होता. या व्यक्तीने रोहनकडून सहा लाख रुपये घेतले. तो रोहनला आरपीएफमध्ये  कामाला लावणार होता. रोहनसह त्याच्या आठ नातेवाईकांचे पैसे देखील त्या व्यक्तिला दिले आहे. रोहन याची त्या व्यक्तीशी अहमदनगर येथील एका खाजगी पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या डायरेक्टरने करुन दिली होती. त्रिदल पाेलिस अकादमी नगरच्या डायरेक्टरने ही भेट घालून दिली होती. या डायरेक्टरने देखील सहा लाेकांचे पैसे दिले आहे. जवळपास १०० पेक्षा जणांकडून त्या व्यक्तीने आरपीएफमध्ये नोकरी लावण्याच्या नावाखाली पैसे उकळले आहे.

इतकेच नव्हे तर रोहन उतेकर याच्यासह काही तरुणांना कलकत्ता येथे नेऊन त्याची मेडीकल करण्यात आली. बिहार राज्यातील पटणा येथे तीन महिने ठेवून त्यांची ट्रेनिंगही घेतले. तरुणांनी आमची आरपीएफमध्ये भरती केव्हा होणार? अशी विचारणा केली असता तो त्यांना कोणत्या ना कोणत्या रेल्वे कार्यालयात घेऊन जायचा. परंतु नोकरी अद्याप लागली नव्हती. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे पोलिसांनी या भामट्याचा शोध घेत तपास सुरू केला.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply