Kalyan News : मनसेचा मराठी पाट्यासंदर्भात २७ फेब्रुवारीचा अल्टिमेटम; कल्याणमध्ये मनसे आक्रमक

Kalyan News : मराठी पाट्यासंदर्भात कल्याण डोंबिवलीमधील मनसे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. मनसे पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांची भेट घेत कल्याणमधील बहुतांश दुकानांवर अद्याप मराठी पाट्या  नसल्याचे निदर्शनास आणून देत कारवाई कधी करणार असा सवाल विचारला. तसेच याबाबत २७ फेब्रुवारीचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. 

न्यायालयाच्या आदेशानंतरही कल्याण शहरात बहुतांश दुकानांवर इंग्रजी पाट्या झळकत आहेत. मराठी पाट्यांबाबतची कारवाई ही कामगार आयुक्त कार्यालयाकडे असल्याने महापालिका हतबलता दर्शवत आहे. तर कामगार कल्याण आयुक्त कार्यालयाकडे मनुष्यबळ कमी असल्याची सबब दिली जातेय. मराठी पाट्या संदर्भात मनसे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांकडून गेल्या अनेक महिन्यांपासून पाठपुरावा सुरू आहे. त्यानंतरही मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानदारांवर कारवाई झाली नाही. मराठी पाट्या संदर्भात आता मनसेनेआक्रमक पवित्रा घेतला आहे.

Balasaheb Thorat : सत्ताधारीच गुन्हेगार झालेत, न्याय कोणाला मागायचा; आमदार बाळासाहेब थोरात यांचा खोचक टोला

तर तोडफोड आंदोलन 

मनसेचे माजी आमदार व शहर अध्यक्ष प्रकाश भोईर, जिल्हाप्रमुख उल्हास भोईर, महिला शहराध्यक्ष कस्तुरी देसाई यांच्या  नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आज महापालिका आणि कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांची भेट घेतली. कल्याणमधील बहुतांश दुकानांवर अद्यापही मराठी पाट्या नसल्याचे निदर्शनास आणून देत कारवाई कधी करणार असा सवाल विचारला. मराठी भाषा दिन म्हणजेच २७ फेब्रुवारीपर्यंत कारवाई झाली नाही, तर तोडफोड करण्याची सुरुवात तुमच्या कार्यल्यापासून करू. त्यानंतर दुकाने फोडू असा इशारा यावेळी मनसेने कामगार आयुक्त कार्यलयातील अधिकाऱ्यांना दिला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply