Kalyan News : ठाकरे गट महिला आघाडीकडून किरीट सोमय्यांचा निषेध; फोटोला जोडे मार आंदोलन

कल्याण : किरीट सोमय्या यांच्या कथित व्हायरल व्हिडीयो व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या विरोधात कल्याणात ठाकरे गट महिला आघाडीकडून किरीट सोमय्या यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मार आंदोलन करत पोस्टर पायदळी तुडवत निषेध व्यक्त केला.

किरीट सोमय्या यांचा कथित व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओवरुन ठाकरे गट चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. किरीट सोमय्या यांच्या कथित वादग्रस्त व्हायरल व्हिडिओप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करत किरीट सोमय्या विरोधात ठाकरे गटाकडून आंदोलन छेडण्यात आले आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar Accident : इलेक्ट्रिक शिवाई बस अन् कारचा भीषण अपघात; कारचालकाचा जागीच मृत्यू, 6 गंभीर जखमी

या पार्श्वभूमीवर कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे महीला आघाडीच्यावतीने किरीट सोमय्या यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारो आंदोलन करत फोटो पायदळी तुडवत निषेध नोंदवण्यात आला. यावेळी किरीट सोमय्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply