Kalyan News : मुंबई लोकलमध्ये राडा, धक्का लागला म्हणून ३ जणांवर चाकूने हल्ला

Kalyan News : मुंबई लोकलमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. धक्का लागला म्हणून एका तरूणानं तीन प्रवाशांवर चाकूने सपासप वार केले आहेत. यामध्ये तीन प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतलं असून, आरोपी जियाची चौकशी सुरू आहे.

कल्याण ते डोंबिवली दरम्यान धावत्या लोकलमध्ये चाकू हल्ल्याची धक्कादायक घटना घडली. लोकलमध्ये धक्का लागला म्हणून वाद झाला होता. याचदरम्यान, मुंबईत राहणाऱ्या १९ वर्षीय शेख जिया हुसेन या तरूणाला राग अनावर झाला. त्याने रागाच्या भरात खिशातला चाकू काढून तीन प्रवाशांवर हल्ला केला.

अक्षय वाघ, हेमंत काकरिया , राजेश चांगलानी असे जखमी प्रवाशांची नावे आहेत. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

Murud Rural Hospital : मुरुड ग्रामीण रुग्णालयाच्या जीर्ण इमारतीचा भाग कोसळला; मोठा अनर्थ टळला

नेमकं घडलं काय?

कल्याणवरून दादरला जाणाऱ्या ९:४७ जलद लोकलमध्ये हल्ल्याची घटना घडली. एकाचा धक्का लागण्यावरून प्रवाशांमध्ये वाद झाला होता. रागाच्या भरात १९ वर्षीय तरूण शेख जिया हुसेन यानं खिशातला चाकू काढला. नंतर भर ट्रेनमध्ये त्यानं ३ जणांवर सपासप वार केले. वार केल्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली.

माहिती देण्यात आल्यानंतर प्रवाशांनी आरोपी जिया हुसेन शेखला डोंबिवली लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिलं. आरोपीला बेड्या ठोकल्यानंतर त्याची चौकशी पोलीस करीत आहेत. या प्रकरणानंतर काही वेळ कल्याणहून दादरला जाणाऱ्या लोकलमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply