Kalyan News : कल्याणमध्ये विद्यार्थी-तरुण ड्रग्जच्या विळख्यात, महिलेला अटक करत साडेपाच लाखांची ब्राऊन शुगर जप्त

Kalyan News : कल्याणचा 'उडता पंजाब' होत चालल्याचे चित्र दिसत आहे. कल्याणमधील विद्यार्थी आणि तरुण ड्रग्जच्या विळख्यामध्ये अडकले आहेत. कल्याण पोलिसांनी धडक करावाई करत ड्रग्जची विक्री करणाऱ्या एका महिलेला अटक केली. ब्राऊन शुगरची विक्री करणाऱ्या महिलेल्या कल्याणच्या टिळक नगर पोलिसांनी अटक केली. या महिलेकडून पोलिसांनी साडेपाच लाखांचे ब्राऊन शुगर जप्त केले आहे. पोलिसांकडून या महिलेची चौकशी सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्व परिसरातील कचोरे हनुमान नगर परिसरातून टिळक नगर पोलिसांनी ड्रग्स माफिया वृद्ध महिलेला सापळा रचून अटक केली. सलमाबेगम नूर मोहम्मद शेख असे या महिलेचे नाव आहे . या महिलेला 2015 मध्ये देखील ड्रग्स विक्री प्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. सलबेगमवर टिळक नगर पोलिस महिनाभर लक्ष ठेवून होते. तिची संपूर्ण माहिती मिळात याच परिसरात सापळा रचत पोलिसांनी तिला अटक केली. या महिलेकडून 104 ग्राम वजनाचे ब्राऊन शुगर जप्त केली. सलमाबेगम ड्रग्स कुठून आणत होती कुणाला विक्री करत होती याचा तपास टिळक नगर पोलिस करत आहेत .

Latur Accident News : लातूरमध्ये भीषण अपघात; कार आणि ट्रकच्या धडकेत 4 जणांचा जागीच मृत्यू

हनुमाननगर परिसरात राहणारी 65 वर्षीय महिला ड्रग्जची विक्री करत असल्याची टिळक नगर पोलिसांना माहिती मिळाली होती. विद्यार्थी आणि तरुणांना ही महिला ट्रक्स विक्री करत होती. 2015 मध्ये या महिलेला टिळक नगर पोलिसांनी ट्रक विक्री प्रकरणीच अटक केली होती. जेलमधून सुटल्यानंतर तिने पुन्हा ड्रग्ज विक्रीला सुरूवात केली. डोंबिवलीतील टिळकनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक विजय कदम यांना ही माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी पोलिसांचे एक पथक तयार केले. पोलिसांनी सापळा रचून या महिलेला रंगेहात अटक केली.

या महिलेविरोधात कारवाई करण्यासाठी पोलिस त्या परिसरातील एका शाळेच्या छतावर जाऊन पाळत करत होते. या महिलेच्या हालचालीवर पोलिसांचे लक्ष होते. तिला कोण-कोण भेटते याची माहिती पोलिसांनी गोळा केली. त्यानंतर तिला रंगे हाथ पकडले. या महिलेकडून 104 मार्फीन ड्रग्ज जप्त करण्यात आले. त्याची बाजारातील किंमत साडेपाच लाख रुपये आहे. या महिलेला ड्रग्जचा पुरवठा कोण करायचा?, यामध्ये एखाद्या टोळीचा समावेश तर नाही ना?, कोणत्या शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांना ती ड्रग्ज देत होती या सर्व बाजूने पोलिस तपास करत आहेत.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply