Kalyan News : महेश गायकवाड गोळीबार प्रकरण, भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या मुलाचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

Kalyan News : शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार करणारे भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे सुपुत्र वैभव गायकवाड यांचा जामीन अर्ज कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळलाय. त्यामुळे घटना घडल्यानंतर दोन महिन्यांपासून फरार असलेल्या वैभव गायकवाड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

मिळालाय माहितीनुसार, २ फेब्रुवारी रोत्री उल्हासनगर हिल लाईन पोलिस ठाण्यात द्वारली येथील जागेच्या वादातून भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याण शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड आणि त्यांच्या साथीदारावर गोळीबार केला होता. या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Buldhana News : शाळेत येत मुख्याध्यापकाने संपविले जीवन; जानेफळ येथील घटना

तसेच आमदार गायकवाड यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली. ते आत्ता तळाेजा कारागृहात आहे. दरम्यान, या प्रकरणात आरोपी असलेले आमदार गायकवाड यांचे सूपूत्र वैभव हे घटनेच्या दिवसापासून फरार आहेत. वैभव गायकवाड यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मंगळवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात तब्बल तीन तास सुनावणी पार पडली.

मात्र न्यालायाने त्यांच्या अर्जावरील निकाल राखून ठेवला होता. आज त्यांच्या अर्जावर निकाल दिला आहे. त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे वैभव यांच्या अटकेची शक्यता वाढली आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply