Kalyan Crime News : अनधिकृत पाण्याच्या कनेक्शनवरून वाद, तरूणावर धारदार शस्त्रानं वार; कल्याण हादरलं

Kalyan Crime News : अनधिकृतपणे पाण्याचे कनेक्शन घेण्यासाठी विरोध करणाऱ्या तरुणाला शिवीगाळ करत बेदम मारहाण करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना कल्याणच्या जुन्या मच्छी मार्केट परिसरात घडली आहे. मुदस्सर काझी असे जखमी तरुणाचे नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

कल्याणचे जुने मच्छी मच्छी मार्केट परिसर मारहाण प्रकरणानंतर हादरलं आहे. अनधिकृतपणे पाण्याचे कनेक्शन घेण्यासाठी विरोध करणाऱ्या तरूणाला शिवीगाळ करत बेदम मारहाण करण्यात आली आहे. मुदस्सर काझी या तरूणाला ताबीज मुल्ला आणि अबजल मुल्ला या दोघांनी मिळून बेदम मारहाण केली आहे.

मुदस्सर काझी हे कल्याण पश्चिम मधील जुना मच्छी मार्केट मुल्ला चाळ येथे कुटुंबासह राहत आहे. याच परिसरात ताबिज मुल्ला हा पाण्याची एक इंचाची पाईपलाईन टाकत होता. ही अनधिकृत नळ जोडणी असल्यानं मुद्दसर याने या नळ जोडणीला विरोध केला. त्यामुळे ताबीज मुल्ला आणि मुदस्सर या दोघांमध्ये वाद झाला होता.

Mumbai News : मोबाइल का वापरते? वडिलांनी झापलं,म्हणून मुलीने घर सोडलं

याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात दोघांनी तक्रार देखील दाखल केली होती. त्यानंतर या दोघांचे भांडण मिटले. मात्र, या वादाचा राग मनात धरून ताबीज मुल्ला यानं मुदस्सर याला फोन करून शिवीगाळ केली. घराबाहेर बोलावून ताबिज आणि त्याचा भाऊ अबजल मुल्ला या दोघांनी मुदस्सर याला बेदम मारहाण केली. त्याच्या अंगावर तीक्ष्ण हत्याराने वार केले.

या हल्ल्यात मुदस्सर गंभीर जखमी झालाय. तसेच त्याच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात ताबीज मुल्ला आणि अबजल मुल्ला या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply