Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांना न्यायालयाचा मोठा दिलासा, अटकपूर्व जामीन मंजूर

Thane: ठाणे महानगर पालिकेचे अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यासह त्यांच्या सात कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणात महत्वाची माहिती समोर येत असून जितेंद्र आव्हाड यांचा अटकपुर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. आज सकाळी आव्हाड यांच्या वकिलांनी अटक पूर्व जामीनसाठी अर्ज केला होता. त्या नंतर आता आव्हाड यांचा अटक पूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे..

दोन दिवसांपुर्वी जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबीयांना मारण्याचा कट रचला जात असल्याची खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर आली होती. ही क्लिप ठाणे महानगर पालिकेचे अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहे यांची असल्याचा आरोप करण्यात आला होता.

यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकत्यांनी महेश आहेर यांना पालिका मुख्यालयात गेटवर लाथाबुक्क्यांनी चोप दिला. या मारहाणीत महेश आहेर यांना मुका मार लागला असून त्यांच्यावर ठाण्यातील ज्यूपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आव्हाडांविरोधात तक्रार दाखल केली होती..

या हल्ल्यानंतर महेश आहेर यांनी ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात आपल्यावर झालेल्या हल्ल्याची तक्रार नोंदवली होती. ज्यामध्ये आपण आव्हाड यांच्या मतदार संघात केलेल्या बेकायदेशीर बांधकाम तोडल्या प्रकरणी मनात राग धरून आव्हाड यांच्या सांगण्यावरून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने बंदूक आणि चॉपरच्या सहाय्याने वार करण्याच्या हेतूने हल्ला केला असल्याचं तक्रारीत नमूद केले होते.

या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यासह त्यांचे पीए अभिजित पवार, हेमंत वाणी, विक्रम खामकर व इतर ३ जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आता जितेंद्र आव्हाड यांना अटकपुर्व जामीन मंजुर करण्यात आला आहे..



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply