Jammu Kashmir News : राजौरीमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद, 1 अधिकाऱ्यासह 4 जखमी

Jammu Kashmir News  : जम्मू विभागातील राजौरी जिल्ह्यातील कंडी भागात शुक्रवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या घटनेबाबत लष्कराने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, चकमकीत दोन जवान शहीद झाले आहेत. तर एका अधिकाऱ्यासह चार जण जखमी झाले आहेत.

तसेच या चकमकीत दहशतवादीही मारले जाण्याची शक्यता आहे. तर जखमी जवानांना कमांड हॉस्पिटल उधमपूरमध्ये दाखल करण्यात आले आहे. या सोबतच सुरक्षेच्या दृष्टीने इंटरनेट सेवा सध्या बंद करण्यात आली आहे.

लष्कराच्या उत्तरी कमांडच्या हवाल्याने सांगण्यात आले की, ऑपरेशन दरम्यान दहशतवाद्यांनी स्फोट घडवून आणला ज्यात दोन जवान शहीद झाले आणि चार जखमी झाले. जखमींमध्ये एका अधिकाऱ्याचा समावेश आहे.

जम्मू काश्मिर मध्ये लष्कर आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने परिसरात दहशतवाद्यांविरोधात शोध मोहीम सुरू केली. यादरम्यान, संयुक्त पथके संशयित ठिकाणी पोहोचताच लपलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यात चार जवान शहीद झाले असून एका अधिकाऱ्यासह चार जण जखमी झाले आहेत. जवळपासच्या भागातून अतिरिक्त पथके चकमकीच्या ठिकाणी रवाना करण्यात आले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply