
Jammu-Kashmir Encounter : जम्मू काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत भारतीय सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला आहे, तर अन्य तीन जवान जखमी झाले आहेत. किश्तवाडमधील कुंतवारा व केशवान या भागातील घनदाट जंगलात दोन दहशतवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानुसार, भारतीय सुरक्षा दल व जम्मू काश्मीर पोलीसांकडून संयुक्तपणे शोधमोहीम राबवण्यात आली. शोधमोहीमेवेळी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत नायब सुभेदार राकेश कुमार हे शहीद झाले, तर अन्य तीन जवान जखमी झाले आहेत. भारतीय सुरक्षा दलाच्या ‘व्हाईट नाईट कॉर्प्स’ या अधिकृत एक्स (ट्विटर) खात्यावरून याबाबत माहिती देण्यात आली आहे.
शोधमोहीम सुरू असताना दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत नायब सुभेदार राकेश कुमार व अन्य तीन जवान जखमी झाले होते. चौघांना उपचारांसाठी उधमपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, उपचार सुरू असताना राकेश कुमार यांची प्राणज्योत मालवली, तर अन्य तीन जखमी जवानांवर सध्या उपचार सुरू आहेत. राकेश कुमार हे २ पॅरा एसएफमध्ये (स्पेशल फोर्सेस) कार्यरत होते. दहशतवाद्यांनी केलेल्या ह्या भ्याड हल्ल्यानंतर सुरक्षा दल व जम्मू काश्मीर पोलिसांकडून घटनास्थळी व्यापक स्वरुपात शोधमोहीम सध्या सुरू आहे.
|
Sangli : सांगलीत मोठी राजकीय घडामोड, ठाकरेंच्या युवासेनेचा भाजपला पाठिंबा
|
जवानांवर हल्ला झाला त्या ठिकाणाहून काही अंतरावरच काल (९ नोव्हेंबर) ग्राम संरक्षण दलातील दोन जवानांचे मृतदेह आढळून आले होते. ग्राम संरक्षण दलातील नाझिर अहमद व कुलदीप कुमार या दोन जवानांचे दहशतवाद्यांनी अपहरण केले होते. त्यानंतर दोघांची हत्या केली. जैश-ए-मोहम्मदचा गट काश्मीर टायगर्सने या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. या हत्येत दोन दहशतवाद्यांचा सहभाग असल्याची शक्यता वर्तवली जात असून त्यांचा शोध सध्या सुरू आहे.
भारतीय लष्कराच्या ‘व्हाईट नाईट कॉर्प्स’ने दिलेल्या माहितीनुसार किश्तवाड जिल्ह्यातील भरत रिज या भागात भारतीय सुरक्षा दलाकडून शोधमोहीम राबवण्यात आली होती. त्यावेळी दहशतवाद्यांशी उडालेल्या चकमकीत नायब सुभेदार राकेश कुमार यांनी सर्वोच्च बलिदान दिले. ‘व्हाईट नाईट कॉर्प्स’कडून राकेश कुमार यांच्या कुटुंबियांप्रति संवेदना व्यक्त करण्यात आल्या आहेत. दरम्यान, ८ नोव्हेंबर रोजी बारामुल्ला येथे सुरक्षा दल व दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली होती. त्यात भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. जम्मू विभागातील राजौरी, पूंछ, रियासी, उधमपूर, डोडा आणि कठुआ या जिल्ह्यांसह किश्तवाडमध्ये या वर्षी दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ? नितीश कुमार राज्यसभेवर, भाजपला मुख्यमंत्रीपदाची संधी.
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

