Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये चकमकीत कर्नलसह 3 अधिकारी शहीद, राजौरीमध्ये 2 दहशतवादी ठार

Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत भारतीय सैन्याच्या कर्नलसह सुरक्षा दलाचे तीन जवान शहीद झाले आहेत. याबाबत माहिती देतानाअधिकाऱ्यांनी सांगितले की, अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग भागात ही चकमक झाली.

त्यांनी सांगितलं की, गोळीबारात कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष, जम्मू-काश्मीर पोलिसांचे उपअधीक्षक (डीएसपी) हुमायून भट गंभीर जखमी झाले होते. नंतर त्यांचा मृत्यू झाला. जास्त रक्तस्त्राव झाल्याने भट यांचा मृत्यू झाल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, गडोले भागात दहशतवाद्यांविरोधातील कारवाई मंगळवारी संध्याकाळी सुरू झाली होती. मात्र ती रात्री थांबवण्यात आली. दहशतवाद्यांना लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर आज सकाळी पुन्हा त्यांचा शोध सुरू करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. दहशतवाद्यांवर हल्ला करणाऱ्या त्यांच्या टीमचे नेतृत्व लष्कराचे कर्नल करत होते. मात्र, दहशतवाद्यांनी त्याच्यावर गोळीबार केला, ज्यात ते गंभीर जखमी झाला.

Hotel Bademiya : मुंबईतील प्रसिद्ध बडेमिया हॉटेलला टाळं, FDAची कारवाई; किचनमध्ये आढळले उंदीर, झुरळे

दुसरीकडे जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये बुधवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी आणखी एका दहशतवाद्याचा खात्मा केला. जिल्ह्यातील एका दुर्गम गावात तीन दिवस चाललेल्या कारवाईत ठार झालेल्या दहशतवाद्यांची संख्या 3 झाली आहे.

येथील नारला गावात मंगळवारी झालेल्या चकमकीत एका संशयित पाकिस्तानी दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. या गोळीबारात सैन्याचा एक जवान आणि डॉग युनिटची एक 6 वर्षीय मादा लॅब्राडोर केंटही शहीद झाली, तर तीन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply