Jalna News : लाठ्या-काठ्यांचा काळ गेला, उगाच गावाची शांतता बिघडवू नका; लक्ष्मण हाके संतापले

Jalna News : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या बीड जिल्ह्यातील मातोरी या गावात दगडफेक झाल्याची घटना समोर आली. डीजे वाजवण्याच्या वादातून ही दगडफेक झाल्याची प्राथामिक माहिती समोर आली. या घटनेमुळे गावात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या गावात तणापूर्ण शांतता असून पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
 

दरम्यान, ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी या दगडफेकीच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. मातोरी गावातील घटना अतिशय दुर्दैवी आहे, अशी खंत हाके यांनी व्यक्त केली आहे. गाड्या फोडून किंवा दहशत माजवून कुणी जर कायद्याला चॅलेंज करीत असतील तर अशा लोकांचा मी निषेध करतो. असंही हाके यांनी म्हटलंय.

Devendra Fadnavis : जयंतराव खोटं बोलायचं‌ तरी किती? देवेंद्र फडणवीस अचानक इतके आक्रमक का झाले ?

आता लाठ्या-काठ्यांचा काळ गेला असून आपण बुद्धीने चाललं पाहिजे, असं आवाहन यावेळी लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आणि मराठा समाजातील तरुणांना केलं आहे. दगडफेकीच्या घटनेवर हाके म्हणाले, की मला इथे यायच्या अगोदर बातमी कळाली. एका गावात दगडफेक झाली, असं ऐकायला मिळालं. हे अठरापगड जातीचा बीड जिल्हा आहे.

या तरुणांचा उत्साह बघितला, ना की आठवण येते, कधीकाळी लाठ्या-काठ्यांची लढाई व्हायची, आज लढाई होतेय ती हिमती वरती, बॅलेटवरती होतेय, कलमाने होतेय, शिक्षणाने होतेय, फक्त आपलं डोकं शाबूत ठेवायचे, तुमचा कोण परका कोण ? हे ओळखायचे. असं म्हणत ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी मातोरी गावातील घटनेवर जाहीर भाषणातून प्रतिक्रिया दिली आहे
 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply