Jalna News : ठेवीदारांचा रास्ता रोको; ज्ञानराधा पतसंस्थेतील ठेवी परत देण्याची मागणी

Jalna News : जालना जिल्ह्यातल्या अंबड शहरात आज ज्ञानराधा पतसंस्थेच्या ठेवीदारांनी अचानक रास्ता रोको आंदोलन  केलं. मागील अनेक दिवसांपासून पतसंस्थेचे ठेवीदार पैसे परत मिळावे यासाठी उपोषणाला बसले होते. मात्र आज अचानक या उपोषणकर्त्या ठेवीदारांनी रास्ता रोको करत पैसे परत मिळण्याची मागणी केली. 

अंबड शहरातील ज्ञानराधा पतसंस्थेत अनेक ठेवीदारांनी त्यांची आयुष्याची जमापुंजी ठेवली होती. मात्र ही पथसंस्था अचानक बंद पडली आणि ठेवीदारांनी ठेवलेल्या ठेवीच्या रक्कम बुडाली. आम्ही कष्ट करून जमा केलेली रक्कम आम्हाला परत मिळावी; यासाठी ठेवीदारांनी आंदोलन पुकारले आहे. मागील काही दिवसांपासून ठेवीदार उपोषणाला बसले आहेत. 

Russia -Ukraine War : रशियात अडकले २० भारतीय; परदेशात नोकरी देतो म्हणून थेट उतरवलं रशिया-युक्रेनेच्या युद्धात

 

तर जेलभरो आंदोलन 

दरम्यान आज उपोषणकर्ते ठेवीदार आक्रमक झाले असून त्यांनी अचानक  रास्ता रोको आंदोलन केले. अंबड-जालना महामार्गावर केलेल्या या रास्ता रोकोमुळे वाहतूक विस्कळीत होऊन महामार्गावर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. अंबड तहसीलदार यांच्या मध्यास्तीने हे आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र आमचे पैसे आम्हाला परत मिळाले नाही, तर आम्ही जेलभरो आंदोलन करू असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply