Jalna Lathi Charge : शैलेश बलकवडे जालन्याचे नवे पोलीस अधीक्षक, लाठीचार्ज प्रकरणी एसपी तुषार दोषींना पाठवले सक्तीच्या रजेवर

Jalna Lathi Charge  : जालन्यातील अंतरवाली सराटी गावामध्ये मराठा आंदोलकांव पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज प्रकरणाचे पडसाद आता राज्यभरामध्ये उमटू लागले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ राज्यभरातील अनेक जिल्ह्यांमध्ये आंदोलनं, निदर्षने आणि बंद पुकारण्यात आला आहे.

या लाठीचार्ज प्रकरणी राज्य सरकारने मोठी कारवाई करत जिल्ह्याचे पोलीस निरीक्षक तुषार दोषी (SP Tushar Doshi) यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. त्यानंतर आता जालना जिल्ह्याला नवीन पोलीस अधीक्षक मिळाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शैलेश बलकवडे हे जालना जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक झाले आहेत. शैलेश बलकवडे यांनी आज पोलीस अधीक्षक पदाचा चार्ज घेतला. जालना जिल्ह्याचे आधीचे पोलीस अधीक्षक तुषार दोषींना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्यामुळे शैलेश बलकवडे हे आता नवीन अधीक्षक झाले आहेत. मराठा आंदोलकांना मारहाण प्रकरणी तुषार दोषींना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.

'

Nashik News : मिल्क पावडर कॉस्टिक सोड्यापासून भेसळयुक्त दूध; नाशिक जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार

जालना जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलनाला बसलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी शुक्रवारी लाठीचार्ज केला. या घटनेनंतर जिल्ह्यामध्ये दगडफेक, जाळपोळीच्या घटना घडल्या. पोलीस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या झटापटीमध्ये ८ पोलिसांसह अनेक आंदोलक देखील जखमी झाले होते. या घटनेनंतर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांचे नाव पुढे आले होते. त्यानंतर गृहविभागाने त्यांच्याविरोधात सक्तीच्या रजेवर पाठवण्याची कारवाई केली.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील बुलडाण्यातील सभे दरम्यान यासंदर्भात मोठं वक्तव्य केले होते. त्यांनी सांगितले होते की, 'जालन्याचे एस पी, अतिरिक्त एस पी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. चौकशी झाल्यानंतर निलंबन करावं लागलं तर ते ही करू.' त्याचसोबत, 'याप्रकरणाची न्यायालयीन चौकशी देखील करू.' असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply