Jalna : मध्यरात्री काळाचा घाला, अपघातात माय-लेकीचा जागेवरच मृत्यू, २ जण जखमी

Jalna Ambad road accident : जालन्यातील अंबड तालुक्यातील सुखापुरी फाट्यावर भीषण अपघात झाला . ट्रॅव्हल आणि टेम्पोची समोरासमोर धडक होऊन मायलेकींचा दुर्देवी मृत्यू झाला आहेअंजना पुरुषोत्तम सापनर वय ३० व अनुसया पुरुषोत्तम सापनर वय १४ रा. धानोरा ता. शेणगाव जि. हिंगोली असं मयत मायलेकींची नावे आहेत. तरी अपघातामध्ये दोघेजण गंभीर जखमी आहेत. तर अपघातामध्ये जवळपास सहा जण किरकोळ जखमी झाले आहे.बीड वरून जालना कडे येणारी ट्रॅव्हल आणि विरुद्ध दिशेने जाणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या टेम्पोची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झालाय.मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला असून जखमीवर अंबड येथील शासकीय आणि जालना येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवले आहे.

मध्यरात्री भीषण अपघात

जालन्यातील अंबड तालुक्यातील सुखापुरी फाट्यावर अंबड - वडीगोद्री रोडवर मध्यरात्री भीषण अपघात झाला आहे. ट्रॅव्हल आणि टेम्पोची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झाला असून या अपघातात दोघांचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला आहे. तर दोघेजण गंभीर जखमी आहेत जखमींवर सध्या जालन्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहे..

Mumbai Metro Fare Hike : मुंबईकरांना झटका, मेट्रोच्या तिकिटात वाढ होणार!

मायलेकींच्या मृत्यूने हळहळ

जालन्यातील सुखापुरी फाट्यावर मध्यरात्री भीषण अपघात झाला. या अपघातात मायलेकींचा मृत्यू झाला आहे.अंजना पुरुषोत्तम सापनर वय ३० आणि अनुसया पुरुषोत्तम सापनर वय १४ रा. धानोरा ता. शेणगाव जि. हिंगोली असं मयत मायलेकीचं नाव आहे. मायलेकीच्या मृत्यूमुळे परिसरामध्ये एकच हळूहळू व्यक्त केली जात आहे.

अपघातात दोघे गंभीर जखमी तर सहा जण किरकोळ जखमी

अपघातामध्ये पुरुषोत्तम नाथराव सापनर वय ४० गंभीर जखमी असून कृष्णा पुरुषोत्तम सापनर वय १६ रा. धानोरा ता. शेणगाव जि. हिंगोली,बाळू शेळके वय ३५, सतीश लव्हटे वय ३५ रा. तडेगाव ता. भोकरदन जि. जालना हे किरकोळ जखमी आहे. तर ट्रॅव्हल्स मधील विजय नेहारकर रा. परळी रामचंद्र फड कनेरवाडी, संदीप उमाजी शेप आणि यश फुलारे शेपवाडी असे जखमीचे नावे आहेत.

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply