Jalna Police : निलंबनाच्या कारवाईनंतर पोलीस कर्मचारी गायब; जालना पोलिसात खळबळ, मिसिंगची तक्रार दाखल


Jalna : कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी जालन्याच्या परतूर पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर जालना पोलीस दलातील पोलीस कर्मचारी मागील पाच दिवसांपासून गायब असल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणी परतूर पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

परतूर पोलीस स्टेशनमधील देविदास जाधव असं या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून ते जालन्यातील परतुर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. काही दिवसांपूर्वी वाटुर फाटा येथे एका तरुणाने स्वतःला पेटवून घेतल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपीला नोटीसवर सोडून देण्यात आले होते. मात्र या प्रकरणात कर्तव्यामध्ये कसूर केल्याप्रकरणी जालना पोलीस अधीक्षकांनी या कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली होती.

Follow us -

Mumbai Metro : मुंबईकरांसाठी मोठी बातमी, ४ मेट्रो मार्ग यंदा खुले होणार, वाहतूक कोंडी फूटणार

कोणाला न सांगता गेले निघून

पोलीस कर्मचारी जाधव यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्यानंतर ते गायब झाले आहेत. ५ फेब्रुवारीपासून हा पोलीस कर्मचारी कुणाला न सांगता घरातून निघून गेले आहेत. यामुळे त्यांच्या भावाच्या फिर्यादीवरून जालन्यातील परतुर पोलीस ठाण्यामध्ये मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास परतुर पोलीस करत आहे.

पोलिसांकडून तपास सुरु

जालना जिल्ह्यातील परतूर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत जाधव या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. यानंतर लागलीच ते गायब झाल्याने त्यांचा शोध घेण्यात आला. मात्र कुटुंबियांना ते सापडून न आल्याने पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. या तक्रारीनंतर पोलीस यंत्रणा देखील जाधव यांच्या शोधात लागली आहे. दरम्यान या प्रकरणानंतर पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply