Jalgaon Jamod News : पूर्णा नदीतील वाळू उपशावर तहसीलदारांची कारवाई; १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Bulldhana : जळगाव जामोद तालुक्यातील पूर्णा नदी परिसरात कित्येक वर्षांपासून अवैध वाळू उत्खनन सुरू आहे. या वाळू उपसावर जळगाव जामोद तहसीलदार पवन पाटील यांनी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल १५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अनेक महिन्यानंतर सदरची कारवाई झाल्याने वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे.

वाळू तस्करी मोठ्या प्रमाणात होत असते. रात्रीच्या वेळेस चोरटी वाहतूक केली जात असताना जिल्हा प्रशासन याकडे पूर्णतः दुर्लक्ष करीत असल्याचे स्पष्ट झाले होते. जिल्हाधिकारी यांना जिल्ह्यातील सर्व नद्यांवरून वाळू तस्करी होत असल्याबाबत निवेदन देखील प्राप्त झाली होती. याकडे जिल्हाधिकारी यांनी दुर्लक्ष केले होते. मात्र नंतर राज्यातील सरकार बदलले. यानंतर आता थोडीफार प्रशासन जागे झाले असून जळगाव जामोद तालुक्यातील पूर्णा नदीतील वाळू उपसावर कारवाई करण्यात आली.

Kesar Mango : खवय्यांसाठी खुशखबर..एपीएमसी फळ बाजारात केसर आंब्याची पहिली पेटी दाखल

पूर्णा नदी पात्रातील उपशावर कारवाई

पूर्णा नदीतून मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी केली जात होती. सर्रासपणे होत असलेल्या वाळू तस्करीवर प्रशासनाचा देखील कानाडोळा होता. मात्र अनेक महिन्यानंतर जळगाव जामोदचे तहसीलदार पवन पाटील यांनी वाळू माफिया विरोधात धडक मोहीम राबविण्यास सुरवात केली. या मोहिमेत आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने जळगाव जामोद तालुक्यातील गोळेगाव परिसरातील पूर्णा नदीपात्रात धडक कारवाईला सुरुवात केली.

१५ लाखांचा मुद्देमाल जप्त या धडक मोहिमेत वाळूमाफ्याची क्रेशर मशीन, केणी सह दोन ट्रॅक्टर आणि एक केणी मशीन आणि इतर साहित्य असा जवळपास अंदाजे १५ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. तहसीलदार यांच्या धडक कारवाईने वाळू माफियांचे धाबे दणाणले असून नव्याने आलेले तहसीलदार आता वाळू माफिया करिता कर्दनकाळ तर ठरणार नाही ना अशी चर्चा परिसरात होत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply