Jalgaon Cyber Crime : ईडीच्या कार्यालयातून बोलत असल्याची बतावणी; डॉक्टराची १९ लाखांत फसवणूक

Jalgaon Cyber Crime : सायबर गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. समोरच्या व्यक्तीला भीती दाखवत फसवणूक केल्याचे प्रकार मागील काही दिवसात वाढले असून असाच प्रकार जळगावात समोर आला आहे. या प्रकारात एका डॉक्टरांची फसवणूक झाली आहे. तब्बल १९ लाख रुपयात फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.  

जळगाव शहरातील एका डॉक्टरला १ मे रोजी अंकुश वर्मा आणि सुनीलकुमार नामक व्यक्तींचे फोन आले. त्यांनी डॉक्टरांशी संवाद साधताना आम्ही ईडीच्या ऑफिसमधून बोलतोय. मनी लॉड्रींगमध्ये तुमचे बँक खाते आले आहे. त्यात तुमचा सहभाग आहे,असे दिसतेय. असे सांगत डॉक्टरांच्या मनात भीती निर्माण केली. दरम्यान संशयितांनी त्यांचे बँक खात्याचा क्रमांक पाठवून त्यात पैसे टाकण्यास डॉक्टरला सांगितले. 

Yavatmal News : यवतमाळमध्ये विषबाधा; 19 भाविक आर्णी ग्रामीण रुग्णालयात दाखल, 3 चिमुकल्यांची प्रकृती चिंताजनक

घाबरलेल्या डॉक्टराने समोरच्यानं सांगितल्याप्रमाणे १ ते १८ मेपर्यंत या कालावधीत १९ लाख २० हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले. मात्र, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर डॉक्टरांनी ऑनलाईन तक्रार नोंदविली. त्यानंतर २१ मे रोजी  सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय निकम तपास करीत आहेत.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply