Jalgaon Crime News : वाळूमाफियांसोबत ‘जाम पे जाम’; भडगाव पोलिस ठाण्याचे दोन कर्मचारी निलंबित

Jalgaon Crime News: जिल्‍हाधिकारी आयुषप्रसाद आणि जिल्‍हा पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांच्या संयुक्त मोहिमेद्वारे वाळूमाफियांच्या मुसक्या आवळण्याचे काम सुरु असताना पोलिस ठाणे पातळीवरील कर्मचारी वाळू माफियांसोबत जाम-पे-जाम पार्ट्या करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

त्यासंबंधी व्हिडीओ चित्रीकरण प्राप्त झाल्यावरून भडगाव पोलिस ठाण्याच्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. (police station level personnel doing parties with sand mafia jalgaon crime news)

भडगाव पोलिस ठाण्यात गोपनीय शाखेत कार्यरत आणि कलेक्शनची कामे करत असलेल्या स्वप्नील आणि विलास पाटिल या दोघांचे जिल्‍हा पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांनी निलंबन केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. वाळूमाफियांसोबत आयोजित पार्टीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

Israel Hamas War : दोस्ती तुटायची नाय! जीव धोक्यात घालून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन इस्राइल दौऱ्यावर

काउंटर गुन्ह्यांची ‘थिअरी’

ठाण्यात काऊंटर गुन्ह्याची नवी थिअरी वापरली जात आहे. पहिल्या घटनेत गौणखनिज चोरीचा ट्रॅक्टरची माहिती तहसीलदारांना दिल्यावर त्यांनी ट्रॅक्टर थांबवायला लावला अन्‌ चक्क पत्रकाराच्याच अंगावर ट्रॅक्टर आणला गेला. या घटनेत तब्बल महिनाभर गुन्हा दाखल करण्यास पोलिस निरीक्षकांनी टाळाटाळ केली.

तत्कालीन जिल्‍हाधिकारी अमन मित्तल यांनी जनता दरबारात तहसीलदार आणि पोलिस निरीक्षकांना जाब विचारल्यानंतर संबंधित गौणखनिज वाहतूकदाराचे ट्रॅक्टर ताब्यात घेत सरकारी फिर्याद देण्याऐवजी अंगावर ट्रॅक्टर आणल्या प्रकरणी पत्रकाराला तक्रार देण्यास भाग पाडले.

पत्रकाराने फिर्याद दिल्यानंतर अवघ्या काही मिनिटात समोरच्या व्यक्तीला बोलावून काऊंटर फिर्याद दाखल करून घेण्यात आली.

दुसऱ्या घटनेत गावातील विभक्त राहत असलेल्या बापलेकात वाहनाचा व्यवहार होता. मात्र, वाहनाचा अपघात होवून वाहनाचे मोठे नुकसान झाल्याने विमा कंपनीद्वारे पित्याला १ लाख १० हजार रुपये प्राप्त झाले. यावरुन वाद होऊन पोलिस ठाण्यात प्रकरण आले. मात्र, पोलिसांनी कारवाई करण्याऐवजी शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर सेटलमेंट घडवून आणली. दोघा पक्षाकडून चहा-पाणी मिळवले.

आता मुलगा म्हणतोय माझे १ लाख १० हजारांचे काय? तुम्ही जबाब घेतल्याचे कागदपत्र द्या अशी मागणी केल्यावर पोलिसांनी त्या मुलास पिटाळून लावले. तिसऱ्या घटनेत भडगावच्या पेठ भागातील शेतकरी तसेच पत्रकार भावेश पाटील याने भडगाव पोलिस ठाण्याचे दोघेही पार्टी करत असतानाचे दिसल्यावर त्याने चित्रण केले. तेच चित्रण गावात व्हायरल झाल्याने भडगाव निरीक्षकांच्या सूचनेवरुन चित्रण करणाऱ्या या तरुणावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केल्याचे सांगण्यात आले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply