Jalgaon Crime : भिंतीला भगदाड पाडून कंपनीत चोरी; वस्तूंसह सीसीटीव्हीही नेला चोरून

Jalgaon Crime : जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील वैष्णवी इलेक्ट्रीकल्स या कंपनीची संरक्षण भिंतीला  भगदाड पाडून कंपनीतील मौल्यवान वस्तूंसह एकूण ८४ हजार ६०० रुपयांचे साहित्य चोरट्यांनी लंपास केले आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

जळगाव शहरातील सिंधी कॉलनीत धीरज अशोक गुंडीवाल (वय ३६) कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. त्यांची एमआयडीसी परिसरात डी-सेक्टर येथे वैष्णवी इंटरप्रायजेस नावाने कंपनी आहे. दरम्यान शनिवार साप्ताहिक सुटीचा दिवस असल्याने कंपन्या बंद असतात. या दिवशी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात  चोरट्यांनी कंपनीच्या संरक्षण भिंतीला भगदाड पाडून आत प्रवेश केला. कंपनीतील ७० किलो वजनाचे कॉपर वायरचे तुकडे, पॉलीकॅब कंपनीचे बारा सिलींग फॅन,सपी प्लस कंपनीचे डीव्हीआर, २ सिसीटीव्ही कॅमेरे, असा जवळपास ८४ हजार रुपयांचे साहित्य चोरट्यांनी लंपास केले आहे. 

Nashik News : परवानगीशिवाय ना मोर्चे, ना आंदोलने; नाशिकमध्ये पुढील १५ दिवस मनाई आदेश, नेमकं कारण काय?

धीरज गुंडीवाल ८ जानेवारीला कंपनीत आल्यावर चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चोरट्यांनी भिंतीला भगदाड पाडून आल्याचे निदर्शनास आले. चोरटे आत शिरल्यावर त्यांना घेवुन जाण्यासारखे काहीच सापडत नसल्याने त्यांनी ७० किलो तांब्याच्या तारांचे तुकडे चोरुन नेले. चोरी करताना त्यांचे सीसीटिव्हीत चित्रण झाल्याचे त्यांना शंका आल्याने या चोरट्यांनी दोन सीसीटिव्ही कॅमेरांसह डीव्हीआर चोरुन नेला आहे. एमआयडीसी पोलिसांत या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून सहाय्यक फौजदार विजय पाटील तपास करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply