Jalgaon Bus Accident : दोन बसचा समोरासमोर अपघात; २५ प्रवासी जखमी, कन्नड- चाळीसगाव बायपास रोडवरील घटना

Jalgaon : राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत महामंडळाच्या दोन बस समोरासमोर धडकल्याने हा अपघात झाला असून यात २५ ते २७ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना लागलीच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

जळगावच्या कन्नड- चाळीसगाव बायपास हायवेवर आज सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे व कन्नड डेपोची बस समोरासमोर धडकली. या बसमधील तब्बल २५ ते २७ प्रवासी जखमी झाले. या अपघातातील जखमींना तात्काळ चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात परिसरातील नागरिकांनी उपचारासाठी दाखल केले. या अपघातात धुळे व कन्नड डेपोच्या बसचे मोठे नुकसान झाले आहे. नेमका हा अपघात कसा झाला याबाबत अद्याप माहिती करू शकली नाही.

Satara : आधी पुण्यात ५ कोटी, आता साताऱ्यात एक कोटी; आचारसंहितामध्ये पोलिसांकडून मोठी कारवाई

अपघात झालेल्या दोन्ही बसमध्ये प्रवासी होते. यात एका बसच्या वाहकाकडील साईड दाबली गेल्याने त्या बसमधील प्रवाशी जखमी झाले आहेत. सर्व जखमींना लागलीच उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान या अपघातात दोन्ही बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply