HSC Exam Result : निकाल पाहताच विद्यार्थ्यांचे टोकाचे पाऊल; बारावीत कमी गुण मिळाल्याने जळगाव जिल्ह्यात दोघांची आत्महत्या

Jalgaon : उच्च माध्यमिक शालांत परीक्षा अर्थात बारावी परीक्षेचा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर ऑनलाईन निकाल पहिला. बारावी परीक्षेत यश मिळविले होते. मात्र अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने दोन विद्यार्थ्यांनी टोकाचे पाऊल उचलले. जळगाव जिल्ह्यात दोन विद्यार्थ्यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

फेब्रुवारी- मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल सोमवारी ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे. बारावीचा निकाल चांगला लागला आहे. दरम्यान चांगला अभ्यास केल्याने पेपर देखील चांगले लिहिले होते. त्या तुलनेत गुण कमी मिळाल्याने काही विद्यार्थी नाराज झाले आहेत. अशात जळगाव जिल्ह्यातील ममुराबाद व एरंडोल येथील विद्यार्थ्यांनी कमी गुण मिळाल्याच्या कारणातून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

निकाल पाहताच संपविले जीवन

जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथील ऋषीकेश दिनेश पाटील हा आई- वडील, आजी आणि मोठ्या भावाबरोबर वास्तव्याला होता. विज्ञान शाखेतून बारावीची परीक्षा दिली होती. दरम्यान दुपारी एकला ऑनलाइन निकाल जाहीर झाला. निकालात ऋषीकेशला ४९ टक्के गुण मिळाले. मिळालेले गुण अपेक्षेपेक्षा खूपच कमी असल्याच्या नैराश्यातूनच ऋषिकेश याने घरात कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी दीडच्या सुमारास ही घटना आईच्या लक्षात आली. यावेळी तिने एकच आक्रोश केला.

बहिणीच्या घरीच घेतला गळफास

दुसऱ्या घटनेत एरंडोल येथील कनिष्ठ महाविद्यालयात शिकणाऱ्या भावेश प्रकाश महाजन (वय १९) याने देखील बारावीत कमी गुण मिळाल्याच्या कारणातून आत्महत्या केली आहे. भावेशने बारावी विज्ञान शाखेची परीक्षा दिली होती. परीक्षा दिल्यानंतर सुट्यांमध्ये तो पाचोरा येथे वास्तव्यास असलेल्या बहिणींकडे गेला होता. बारावीचा ऑनलाइन निकाल त्याने मोबाईलवरून पाहिला. यात त्याला ४२ टक्के गुण मिळाले होते. हा निकाल पाहिल्यानंतर त्याने बहिणीच्याच घरी गळफास घेत आत्महत्या केली. दुसऱ्या बहिणीकडे जेवणासाठी जाणार असल्याने दुपारी दोन वाजले, तरी तो आला नाही, म्हणून त्याची बहीण तपास करण्यासाठी गेली असता घटना उघडकीस आली.

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply